HSC SSC Result : दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांचा बहिष्कार, निकाल वेळेतच लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न

HSC SSC Result : दहावी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांचा बहिष्कार, निकाल वेळेतच लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: File Photo

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीनं घेण्यात असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यावर विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी बहिष्कार घातला आहे.

प्रदीप कापसे

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 31, 2022 | 4:13 PM

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यावतीनं घेण्यात असलेल्या दहावी (SSC) आणि बारावीच्या  (HSC)परीक्षा अंतिम टप्प्यात आहेत. दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यावर विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी बहिष्कार  (Non Grants Teachers strike )घातला आहे. यामुळं राज्यातील दहावी आणि बारावीचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. दुसरीकडे दहावी आणि बारावीचा निकाल वेळेतचं लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. विनाअनुदानित शिक्षकांचा पेपर तपासण्यास नकार दिला आहे. मात्र, शिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरू नये, असं आवाहन बोर्डानं केलं आहे. विनाअनुदानित शिक्षकांची मागणी बोर्डानं राज्य शासनाला कळवली असल्याचं देखील समोर आलं आहे.

कारवाई झाली तरी पेपर तपासणार नाही

यंदा दहावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या पेपर तपासायला नकार दिलेला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यांची दखल घेतली जात नसल्याने शिक्षक आक्रमक झाले आहेत. राज्यातील 25 हजार शिक्षक आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर, शिक्षकांनी तपासण्यासाठी आलेले पेपरचे गठ्ठे परत पाठवले आहेत. कारवाई झाली तरी मागण्या पूर्ण होईपर्यंत पेपर तपासणार नाही अशी भूमिका आंदोलक शिक्षकांनी घेतील आहे.

निकाल वेळेतच लागणार

विनाअनुदानित शिक्षकांचा पेपर तपासण्यास नकार दिला असला तरी दहावी आणि बारावीचा निकाल वेळेतचं लावण्याचा बोर्डाचा प्रयत्न असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र,शिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरू नये, असं आवाहन बोर्डानं केलं आहे.मात्र, निकाल वेळेतचं लावणार असल्याची बोर्डाची भूमिका असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे. विनाअनुदानित शिक्षकांची मागणी बोर्डानं राज्य शासनाला कळवली असल्यांचं देखील समोर आलं आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी बहिष्कार

राज्यात शिक्षण विभागानं विनाअनुदानित तत्त्वावर शाळा सुरु करण्यास परवानगी देण्याचं धोरण स्वीकारलं होतं. त्यानंतर विनाअनुदानित शाळांना काही प्रमाणात अनुदान देण्यास सुरुवात केली. विनाअनुदानित शाळातील शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्यानं त्यांनी वेतन आणि इतर मागण्यांसाठी बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. विनाअनुदानित शाळांमधील जवळपास 25 हजार शिक्षकांनी दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. यामुळं दहावी आणि बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इतर बातम्या:

Raj Thackeray Gudipadwa Speech : राज ठाकरेंचा टिझर आला, गुढी पाडव्याच्या “पिक्चर”मध्ये टार्गेट कोण?

BJP MVA: भाजपचे ‘सेंट्रल’ हल्ले ठाकरे सरकारच्या पथ्यावर? जेवढे जास्त हल्ले तेवढी आघाडी मजबूत होतेय? समजून घ्या 5 मुद्यांच्या आधारे


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें