AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP MVA: भाजपचे ‘सेंट्रल’ हल्ले ठाकरे सरकारच्या पथ्यावर? जेवढे जास्त हल्ले तेवढी आघाडी मजबूत होतेय? समजून घ्या 5 मुद्यांच्या आधारे

केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडसत्रामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही, उलट अधिक घट्ट होईल असा दावा आता महाविकास आघाडीतील नेते करताना पाहायला मिळतात.

BJP MVA: भाजपचे 'सेंट्रल' हल्ले ठाकरे सरकारच्या पथ्यावर? जेवढे जास्त हल्ले तेवढी आघाडी मजबूत होतेय? समजून घ्या 5 मुद्यांच्या आधारे
संजय निरुपम, संजय राऊत, सुप्रिया सुळेImage Credit source: TV9
sagar joshi
sagar joshi | Updated on: Mar 31, 2022 | 3:50 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांचं (Central Investigation Agency) धाडसत्रही सुरु झालं. महाविकास आघाडीतील अनेक नेते, मंत्री, आमदार आणि खासदारांवर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी, तसंच आयकर विभागाच्या धाडी सुरुच आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कुटुंबीयांवरही धाडी सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरी या धाडसत्रामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार नाही, उलट अधिक घट्ट होईल असा दावा आता महाविकास आघाडीतील नेते करताना पाहायला मिळतात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही अनेकदा तसा दावा केलाय.

  1. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत याबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय. काही प्रमाणात महाविकास आघाडीतील घटकपक्षांचं हे बंधन पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत झालं आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. तिनही पक्षांचे नेते एकमेकांना पाठिंबा देत असतात. मला सध्या तरी महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद दिसत नाहीत.
  2. सध्या महाविकास आघाडीतील या मजबूत बंधाचे श्रेय भाजपच्या सततच्या हल्ल्यांना आहे. भाजप जेवढं आम्हाला लक्ष्य करेल तेवढी महाविकास आघाडी अधिक घट्ट होईल, असंही निरुमप म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना भाजपनं लक्ष्य केलं. शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्स प्रकरणात गोवण्याचा आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपनं केला. भाजपच्या या हल्ल्यांमुळे आम्हाला जवळ येण्यास मदतच झाली. आम्हाला एकमेकांबद्दल सहानुभूती आहे. आपल्या शेजाऱ्यावर कुणी बाहेरचा व्यक्ती हल्ला करत असेल तर शेजाऱ्याबाबद सहानुभूती वाटणे स्वाभाविक आहे. हा मानवी स्वभाव असल्याचंही निरुमप यांनी म्हटलंय.
  3. महाविकास आघाडीबाबत बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीत काही मतभेद असू शकतात. मात्र केंद्र सरकारकडून सातत्याने सुरु असलेल्या हल्ल्यामुळे सरकार अधिक मजबूत बनले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्षांना अधिक जवळ आणल्याचंही राऊत यांनी म्हटलंय.
  4. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पवार आणि ठाकरे कुटुंबातील नात्याबद्दल भाष्य केलं. सुळे यांनी ठाकरे कुटुंबाची पाठराखण करत पवार कुटुंब त्यांच्यामागे भक्कमपणे उभं असल्याचं म्हटलंय. ठाकरे आणि पवार कुटुंबाचं नातं 55 वर्ष जुनं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे घट्ट मित्र होते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
  5. सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्य भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारीचा महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर कुछलाही परिणाम होणार नसल्याचंही त्या म्हणाल्या.

इतर बातम्या : 

Rahul Gandhi on Modi: प्रश्न न पुछो ‘फकिर’ से, अफगाणिस्तान ते इंडिया, राहुल गांधींनी पेट्रोल डिझेलचे दर दिले, मोदींवर ट्विटस्त्र!

ED Raid : ‘आमच्याकडे मसाला तयार, आम्ही दणका देणार’, ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा थेट इशारा; भाजपवर हल्लाबोल

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?