Rahul Gandhi on Modi: प्रश्न न पुछो ‘फकिर’ से, अफगाणिस्तान ते इंडिया, राहुल गांधींनी पेट्रोल डिझेलचे दर दिले, मोदींवर ट्विटस्त्र!

खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. राहुल गांधी यांनी ट्वीट करुन जगभरातील पेट्रोलचे भाव आणि भारतातील पेट्रोलच्या दराची यादीच दिलीय.

Rahul Gandhi on Modi: प्रश्न न पुछो 'फकिर' से, अफगाणिस्तान ते इंडिया, राहुल गांधींनी पेट्रोल डिझेलचे दर दिले, मोदींवर ट्विटस्त्र!
पेट्रोल दरवाढीवरुन राहुल गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 2:47 PM

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा महागाईनं डोकं वर काढलंय. पेट्रोल आणि डिझेलचे भाव (Petrol, Diesel Rate) तर गगनाला भिडले आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ झाली आहे. बुधवारी देखील इंधनाच्या दरात लिटरमागे 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 101.81 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 93.07 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोल, डिझेलचा दर प्रति लिटर मागे 84 पैशांनी वाढला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 116.72 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 100.94 रुपये झाला आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. राहुल गांधी यांनी ट्वीट करुन जगभरातील पेट्रोलचे भाव आणि भारतातील पेट्रोलच्या दराची यादीच दिलीय.

‘प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान’

राहुल गांधी ट्विटरद्वारे भारताच्या शेजारील देशांमधील पेट्रोलचे भाव सांगितले आहेत. राहुल गांधी यांनी केलेल्या ट्वीटनुसार अफगाणीस्तानात पेट्रोलचे दर 66.99 रुपये प्रति लीटर आहे. तर पाकिस्तानात 62.38 रुपये प्रति लीटर, श्रीलंकेत 72.96 रुपये प्रति लीटर, बांग्लादेशमध्ये 78.53 रुपये प्रति लीटर, भुतानमझ्ये 86.28 रुपये प्रति लीटर, नेपाळमध्ये 97.05 रुपये प्रिती लीटर, तर भारतात 101.81 रुपये प्रति लीटर पेट्रोल असल्याचं सांगितलं. हे ट्वीट करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवरही हल्ला चढवलाय. ‘प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान। जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥’ अशा शब्दात राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.

‘मोदी यांची रोजची टू डू लिस्ट’

राहुल गांधी यांनी कालही मोदींवर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी यांची रोजची टू डू लिस्ट असं म्हणत 5 मुद्द्यांवरुन मोदींवर हल्ला चढवला होता.

इतर बातम्या : 

नवनीत राणा यांच्या पत्राची राष्ट्रीय अनुसूचित आयोगाकडून दखल, 2 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार?

ED Raid : ‘आमच्याकडे मसाला तयार, आम्ही दणका देणार’, ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा थेट इशारा; भाजपवर हल्लाबोल

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.