ना मंत्रिमंडळ विस्तार, ना खातेवाटप, सर्वसामान्यांची कामं खोळंबली, मंत्रालयात येणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट

| Updated on: Aug 03, 2022 | 7:44 AM

मंत्रालयात शुकशुकाट!

ना मंत्रिमंडळ विस्तार, ना खातेवाटप, सर्वसामान्यांची कामं खोळंबली, मंत्रालयात येणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट
mantralaya
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार झाल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Eknath Shinde) अस्तित्वात आलं आहे. मात्र एक महिना उलटून गेल्यानंतरही सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप रखडलेला आहे. त्यामुळे लोकांची कामं खोळंबली आहेत. मंत्रालयात सध्या शुकशुकाट पहायला मिळतोय. सहावा मजला वगळता इतर सर्व मजल्यांवरील मंत्र्यांच्या दालनात शुकशुकाट आहे. एरवी दररोज दोन ते तीन हजार लोक आपले प्रश्न घेऊन मंत्रालयात येत असतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिवशी तर चार ते पाच हजार लोक निवेदनं आणि इतर शासकीय कामांसाठी हजेरी लावत असतात. पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) आणि खातेवाटप झालेलं नसल्याने लोक मंत्रालयात येत नाहीयेत. सध्या फक्त दोनशे जणच मंत्रालयात येतात.

नव्या सरकारच्या स्थापनेला तीस दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी मंत्रिमंडळा अभावी प्रशासकीय यंत्रणेच्या कामाचं चाक रुतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावरच असल्याने फायलींवर सह्या होत नाहीत. अतिवृष्टीग्रस्त भागात शेतीचे पंचनामे आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय रखडले आहेत.चंद्रपूर, नागपूर, वर्धा भागात ते सहा वेळाच मुख्यमंत्र्याच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नसल्याने आमच्या निवेदनाचे का निर्णयासह महसुलाशी संबधित सरासरी दोनशे ते तीनशेच लोक दालनात येऊन गेल्याची माहिती आहे. नुकसान झाले आहे. पण मदतीचा होणार असा त्यांचा सवाल आहे. कोणताही धोरणात्मक निर्णय अजूनही सरकारने घेतलेला नाही.

लोकांची कामं खोळंबली

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे पाच मंत्रीच नसल्याने फायलींवर कोणताही निर्णय होत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत दौऱ्यावरच असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात फायलींचे ढिगारे जमले आहेत. वित्त, महसूल, कृषी विभागाशी संबंधित फायलींवर सह्या होत नाहीत. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांसाठी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कोणीही हजर नाही. त्यामुळे तळमजल्यावरील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या कचेरीत निवेदने जमा करावी लागतात. पण मंत्रीच नसल्याने निवेदनांवर निर्णय होत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

हे सुद्धा वाचा

उदय सामंताकडे पद कायम?

नव्या सरकारचे खातेवाटप झालेले नाही, तरीही मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरील दालनावर उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असा बोर्ड अजून आहे. माजी उर्जा मंत्री नितीन राऊत वगळता इतर सर्व मंत्र्यांच्या दालनावरील बोर्ड हटवण्यात आले आहेत. पण ‘उदय सामंत’ यांचे नाव दालनावर लटकत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांच्याचकडे हे खातं राहणार असल्याचं बोललं जात आहे.