AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकीचा धुरळा, तुमच्या गावात-शहरात कोण किती जागांवर लढणार? अंतिम आकडेवारी समोर

महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून १५ जानेवारीला मतदान होणार आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकसह प्रमुख शहरांमधील महायुती आणि महाविकास आघाडीचे सविस्तर जागावाटप समोर आले आहे.

महापालिका निवडणुकीचा धुरळा, तुमच्या गावात-शहरात कोण किती जागांवर लढणार? अंतिम आकडेवारी समोर
maharashtra seat sharing
| Updated on: Dec 31, 2025 | 11:09 AM
Share

महाराष्ट्रातील आगामी महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्वच पक्ष हे जोमाने तयारीला लागले आहेत. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि राज ठाकरेंच्या मनसेने आपली रणनीती पूर्णपणे निश्चित केली आहे. अनेक प्रमुख शहरांमध्ये भाजपने स्वबळाचा नारा दिला असला, तरी काही ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षांसोबत जागावाटपाचे गणित जुळवले आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नाशिकसह राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांमधील जागावाटपाचे अधिकृत आणि अंतिम आकडे आता समोर आले आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत अधिकच वाढली आहे.

कोणत्या महापालिकेत कोणला किती जागा?

1. मुंबई महानगरपालिका (एकूण 227 जागा)

  • भाजप: 137

  • शिवसेना (शिंदे गट): 90

  • शिवसेना (ठाकरे गट): 164

  • मनसे: 53

  • काँग्रेस: 139

  • अजित पवार गट: 60-70

  • वंचित बहुजन आघाडी: 62

  • रासप: 10

2. पुणे महानगरपालिका (एकूण 165 जागा)

  • भाजप: 165 (स्वबळ)

  • अजित पवार गट: 122

  • शिवसेना (शिंदे गट): 70

  • काँग्रेस: 79

  • शिवसेना (ठाकरे गट): 65

  • शरद पवार गट: 40

3. ठाणे महानगरपालिका (एकूण 131 जागा)

  • शिवसेना (शिंदे गट): 87

  • भाजप: 40

  • उद्धव ठाकरे गट: 53

  • शरद पवार गट: 36

  • मनसे: 28

  • काँग्रेस: 100 (स्वबळ)

  • अजित पवार गट: 75

  • वंचित: 13

4. नाशिक महानगरपालिका (एकूण 122 जागा)

  • भाजप: 122

  • शिवसेना (शिंदे गट): 97

  • अजित पवार गट: 23

  • उद्धव ठाकरे गट: 60

  • मनसे: 20

  • शरद पवार गट: 16

  • काँग्रेस: 12

5. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (एकूण 128 जागा)

  • भाजप: 128

  • अजित पवार गट: 100

  • शिवसेना (ठाकरे गट): 65

  • काँग्रेस: 60

  • शिवसेना (शिंदे गट): 25

  • मनसे: 20

  • शरद पवार गट: 18

6. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (एकूण 122 जागा)

  • शिवसेना (शिंदे गट): 68

  • शिवसेना (ठाकरे गट): 68

  • भाजप: 54

  • मनसे: 49

  • काँग्रेस: स्वतंत्र लढत

7. उल्हासनगर महानगरपालिका (एकूण 78 जागा)

  • भाजप: 78

  • शिवसेना (शिंदे गट): 35

  • टीम ओमी कलानी: 32

8. अहिल्यानगर महानगरपालिका (एकूण 68 जागा)

  • शिवसेना (शिंदे गट): 54

  • राष्ट्रवादी (अजित पवार): 34

  • भाजप: 32

  • राष्ट्रवादी (शरद पवार): 32

  • शिवसेना (ठाकरे गट): 24

  • काँग्रेस: 14

  • मनसे: 8

  • वंचित: 3

निवडणुकांचा कार्यक्रम कसा?

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. संपूर्ण राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी 31 डिसेंबर रोजी पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर, ज्या उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घ्यायची आहे, त्यांच्यासाठी 2 जानेवारी ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अधिकृत आणि अंतिम यादी 3 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल.

प्रचाराचा रणसंग्राम संपल्यानंतर 15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान पार पडणार असून, मतदारांना आपला कौल देता येईल. या निवडणुकीची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मतमोजणी आणि निकाल, जो मतदानानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. याच दिवशी महापालिकांवर कोणाची सत्ता येणार, याचे चित्र स्पष्ट होईल.

अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने
अर्ज दाखल लढती फिक्स.. 11 ठिकाणी युती.. तर 18 महापालिकेत आमने-सामने.
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर
ठाकरेंनी समर्थकाला डावललं अन् फायर आजी थेट 'मातोश्री'वर.
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन..
कुठं रडारड तर कुठं हमरी-तुमरी...तिकीट का नाकारलं? इच्छुकांचा राडा अन...
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा
महापालिका निवडणुकीत AB फॉर्मवरून शिंदे गटाच्या शिवसेनेत राडा.
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट
कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीचे तिकीट.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.