AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा देताय, ‘या’ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

कोरोना काळात राज्य सेवा पूर्व परीक्षा होत असल्यानं परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी काळजी घेणं गरजेचे आहे. (MPSC State Service Prelims)

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा देताय, 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Mar 19, 2021 | 1:43 PM
Share

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणारी राज्य पूर्व परीक्षा 2020, येत्या रविवारी, 21 मार्च 2021 रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात हा परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोना काळात ही परीक्षा होत असल्यानं परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी काळजी घेणं गरजेचे आहे. परीक्षा देण्यासाठी जाण्यापासून परीक्षा केंद्रात परीक्षा देताना काय परीक्षार्थींनीकाही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचे आहे. (Maharashtra Public Service Commission State Service Prelims seven things to remember for exam)

प्रवेशपत्र आणि ओळखीच्या पुराव्याच्या प्रती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला बसणाऱ्या परीक्षार्थींनी आयोगाच्या वेबसाईटवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करुन प्रिंटआऊट काढून सोबत ठेवावी. त्यासोबतच आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड आणि इतर ओळखपत्र ज्याला आयोगानं मान्यता दिलीय त्याची झेरॉक्स प्रत सोबत ठेवावी.

वेळेपूर्वीचं परीक्षा केंद्रावर पोहोचा

कोरोना विषाणू संसर्ग असल्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा खासगी रिक्षा, जीप यांच्यावर मोठा परिणाम झालाय. एसटीसह इतर वाहनांच्या फेऱ्या कमी आहेत त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी सकाळी लवकरच घरातून निघून परीक्षा सुरु व्हायच्या किमान 1 तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचावं. परीक्षा केंद्रावर जाताना तुमचं जेवण, अतिरिक्त मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बाटली, ब्लॅक पेन या गोष्टी सोबत घेऊन जावा.

परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर काय काळजी घ्यावी

परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर तिथं तुमच्याकडून कोरोनासंदर्भातील नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. परीक्षा केंद्रावरील बैठक व्यवस्थेचा बोर्ड पाहताना इतर परीक्षार्थींकडून गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाईल याची खबरदारी घ्या. कोरोना संसर्ग वाढत असल्याचं दिसत असल्यानं मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा.

परीक्षा कक्षात पोहोचल्यावर काय कराल?

राज्यसेवेच्या परीक्षार्थींनी परीक्षा कक्षात पोहोचल्यानंतर बैठक व्यवस्था पाहून घ्या. तुमची बसण्याची जागा स्वच्छ आहे का पाहा. तुम्ही ती सॅनिटायझरचा वापर करुन स्वच्छ करुन घ्या. परीक्षा कक्षातील स्वच्छेतेची परिस्थिती खूपच खराब असल्यास तेथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून द्या. आयोगाने दिलेला ग्लोव्हज खराब झाल्यास बदलून घ्या. पर्यवेक्षकाकडून उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका घेताना सुरक्षित अंतर राहिल याची काळजी घ्या. पेपर संपल्यानंतर व्यवस्थितपणे तो परत करा.

जेवण

पहिला पेपर झाल्यानंतर परीक्षार्थींना जेवणासाठी वेळ दिला जातो. या कालावधीमध्ये उमेदवारांनी घरुन जेवणाचा डबा आणला असल्यास स्वच्छ ठिकाणी बसून खावा. दुसऱ्या मित्रांचा डबा खाणं किंवा पाणी पिणं टाळावं.

परीक्षा कक्षात पुन्हा परतल्यानंतर

जेवणचा ब्रेक संपल्यानंतर परीक्षा कक्षात दुसऱ्या पेपरसाठी परतल्यानंतर पुन्हा एकदा बेंच सॅनिटाईझ करुन घ्या. दुसरा पेपर घेताना आणि देताना पर्यवेक्षकांपासून सुरक्षित अंतर राहिल याची काळजी घ्या.

दोन्ही पेपर संपल्यानंतर

राज्यसेवा पूर्व परीक्षेचे दुसरे पेपर संपल्यानंतर तुम्ही कोरोना संपलेला नाही हे विसरु नका. परीक्षा संपल्यानंतर अनेकदा ताण कमी झाल्याच्या भावनेनं हॉटेलमध्ये जाणं, चहा पिणं, आईस्क्रीम खाणं या गोष्टी करत असतो. मात्र, यावेळी या गोष्टी टाळा. दुसरा पेपर संपल्यानंतर जसं परीक्षा केंद्रावर पोहोचला त्याचप्रमाणं घरी परत जा.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची चार वेळा पुढे गेलेली परीक्षा कोरोना संकटात होत असली तरी ताण बाळगू नका, ताण न घेता परीक्षेला सामोरे जा.

परीक्षेसाठी शुभेच्छा!

संबंधित बातम्या:

खुशखबर ! खुशखबर ! खुशखबर !… MPSC च्या परीक्षा जाहीर; आता तयारीला लागा

CTET 2021 : लवकरच जारी होणार Answer Key, कसे कराल डाऊनलोड?

(Maharashtra Public Service Commission State Service Prelims seven things to remember for exam)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली