CTET 2021 : लवकरच जारी होणार Answer Key, कसे कराल डाऊनलोड?

CTET 2021 ही परीक्षा रविवारी 31 जानेवारी 2021 रोजी आयोजित केली होती. (How to check CTET 2021 exam Answer Key)

CTET 2021 : लवकरच जारी होणार Answer Key, कसे कराल डाऊनलोड?

CTET 2021 exam Answer Key : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE लवकरच केंद्रीय शिक्षक पात्रता CTET 2021 या परीक्षेसाठीची Answer Key 2021 जारी करणार आहे. परीक्षा दिलेले उमेदवारांना ctet.nic.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ही Answer Key डाऊनलोड करता येणार आहे. CTET 2021 ही परीक्षा रविवारी 31 जानेवारी 2021 रोजी आयोजित केली होती. ही परीक्षा देशभरातील 135 शहरांमध्ये घेण्यात आली. (How to check CTET 2021 exam Answer Key)

CTET 2021 परीक्षेसाठी सीबीएसईच्या गाईडलाईन्स

सीबीएसईने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, सीबीएसईच्या सर्व परीक्षांदरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले होते. विशेष म्हणजे यंदा CTET 2021 ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना सीबीएसईकडून परीक्षेचे सेंटर निवडण्याची मुभा देण्यात आली होती.

CTET 2021 exam Answer Key : असे करता येईल डाऊनलोड

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या अधिकृत ctet.nic.in या वेबसाईटवर जाऊन Answer Key डाऊनलोड करु शकता. “CTET Answer Key 2021” या लिंकवर क्लिक करा. सीटीईटी 2021 परीक्षेसाठीचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख भरा. त्यानंतर खाली captcha म्हणून दिसणारा सुरक्षा पिन टाका. यानंतर CTET 2021 exam Answer Key चेक करा. CTET 2021 Answer Key डाऊनलोड करता येईल.

CTET 2021 परीक्षा

CTET 2021 ही परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली होती. यातील पहिला पेपर हा पहिली ते पाचवी या वर्गांसाठी घेण्यात आला होता. तर दुसरा पेपर हा 6 वी ते 8 वी या वर्गासाठी होता. CTET 2021 या परीक्षेत 22 लाखांहून अधिक उमेदवार सहभागी झाले होते. त्यातील 12 लाख उमेदवारांनी पहिला पेपर तर 10 लाख उमेदवारांनी दुसरा पेपर दिला होता.  (How to check CTET 2021 exam Answer Key)

संबंधित बातम्या :

CBSE Class 10-12 TimeTable 2021 : सीबीएसई बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक कसं पाहाल?

Special Story | कोरोनानंतर शाळेची घंटा पुन्हा वाजणार, पण विद्यार्थी-पालकांचा मूड काय?

Published On - 11:57 pm, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI