Special Story | कोरोनानंतर शाळेची घंटा पुन्हा वाजणार, पण विद्यार्थी-पालकांचा मूड काय?

Special Story | कोरोनानंतर शाळेची घंटा पुन्हा वाजणार, पण विद्यार्थी-पालकांचा मूड काय?
school (फोटो प्रातनिधिक)

नुकतीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु होतील, अशी दिली आहे.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jan 17, 2021 | 7:05 AM

मुंबई : नुकतीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु होतील, अशी घोषणा केली शाळा सुरु करताना विद्यार्थी आणि शिक्षक यांनी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, या सर्वांमध्ये एक प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होता तो म्हणजे खरोखरच पालक आपल्या मुलांना आताच्या परिस्थितीला शाळेत पाठवण्याबद्दल अनुकूल आहेत का? कोरोनावर वॅक्सीन तर आले आहे. पण सर्वांपर्यत हे वॅक्सीन पोहचण्यासाठी बराच कालावधी जाणार आहे आणि हे विसरून जायला नको की, कोरोना अजून गेलेला नाही. (Maharashtra School Reopen announcement but what about the mood of the students and parents?)

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू होणार हा निर्णय घेतल्यानंतर लगेचच मुंबईतील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळा आणि महाविद्यालय 15 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत मुंबईतील शाळा आणि कॉलेज बंदच राहणार आहे, असे पत्रक मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले आहे.

maharashtra school-min

मुंबई महानगरपालिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. मात्र तरीही अन्य देशांमध्ये कोरोना विषाणूची दुसरी लाट आणि इतर राज्याची परिस्थिती पाहता मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालय 16 जानेवारी 2021 पासून बंद ठेवण्यात येणार आहे, असे मुंबई महापालिकेच्या पत्रकात नमूद केले आहे. तसेच इतर ठिकाणच्या जिल्हातील शाळा सुरू करण्याचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनावर सोडण्यात आला आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु होतील अशी माहिती दिल्यानंतर आम्ही पालकांशी चर्चा केली की, शासनाच्या या शाळा सुरू करण्याच्या निर्णयाकडे ते कसे बघतात. त्यात पालकांचे म्हणणे असे दिसून आले की, शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र, शाळेमधून कोरोनाचा संसर्ग होणार नाही यांची काळजी कशी घेण्यात येणार हे देखील महत्वाचे आहे. काही पालक अद्याप देखील आपल्या मुलांना शाळेमध्ये पाठवण्यास अनुकूल नाहीत ही देखील वस्तूस्थिती आहे.

कोरोनावर मात करुन आपण शाळा पुन्हा एकदा सुरु केल्या आहेत हा आनंद व्यक्त करणे चुकीचे ठरेल कारण जरी शाळा सुरु झाल्या असतील तरी अनेक मोठ्या समस्या आपल्या पुढे उभ्या आहेत. कारण अजूनही कोरोनाचे संकट गेले नाही. शाळांमधून कोरोनाचा प्रसार होणार नाही, याकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची मानसिक अवस्था कशी आहे, त्यांचा जो वेळ व्यर्थ केली त्याची भरपाई कशी करता येईल, यावर विचार करण्याची गरज आहे.

(Maharashtra School Reopen announcement but what about the mood of the students and parents?)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें