HSC, SSC Result | दहावी आणि बारावीचा निकाल जुलैमध्ये : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत माहिती दिली. Education Minister Varsha Gaikwad on HSC SSC Result

HSC, SSC Result | दहावी आणि बारावीचा निकाल जुलैमध्ये : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
Varsha Gaikwad ssc hsc result
Follow us
| Updated on: Jun 16, 2020 | 7:21 PM

मुंबई : राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे.  राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत माहिती दिली. इयत्ता बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत तर दहावीचा निकाल जुलै अखेरपर्यंत लागेल, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. (Education Minister Varsha Gaikwad on HSC SSC Result)

“लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाला. तर पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. आमचा प्रयत्न होता लवकरात लवकर निकाल लावण्याचा, मात्र तरीदेखील बारावीचा निकाल जुलै 15 पर्यंत आणि दहावीचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लागू शकतो, पेपर तपासणीचं काम सध्या सुरु आहे. ते लवकर झालं तर आणखी लवकर निकाल लावण्याचा प्रयत्न आहे”, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

11 वी प्रवेशाबाबत ऑनलाईन प्रक्रिया करून ती सोप्या पद्धतीने करणार आहे. ऑनलाईन शिक्षणाबाबत पालकांच्या अडचणी दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

बोर्डाच्या अध्यक्षा काय म्हणाल्या होत्या?

यापूर्वी बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनीही निकालाबाबत माहिती दिली होती. शकुंतला काळे म्हणाल्या, “दहावी- बारावीच्या निकालाचं काम अजून चालू आहे. उत्तरपत्रिकांची तपासणी अजून सुरु आहे. उत्तरपत्रिका संकलन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका संकलनाची कामंही थांबली होती. हे काम आटोक्यात आल्यानंतर बोर्डच दहावी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करेल. त्यामुळे आत्ता लगेच निकालाची तारीख सांगता येणार नाही.”

दहावी-बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा

दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरत आहेत. महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाची चिंता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाच्या चुकीच्या तारखा व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केलं होतं.

(Education Minister Varsha Gaikwad on HSC SSC Result)

संबंधित बातम्या 

दहावी-बारावीचा निकाल कधी? बोर्डाच्या अध्यक्षा म्हणतात….. 

SSC and HSC results date | दहावी आणि बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा, बोर्डाचं स्पष्टीकरण   

रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या पेपरबाबत बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.