खुशखबर ! खुशखबर ! खुशखबर !… MPSC च्या परीक्षा जाहीर; आता तयारीला लागा

मागील तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला आहे. (MPSC exams date announcement)

खुशखबर ! खुशखबर ! खुशखबर !... MPSC च्या परीक्षा जाहीर; आता तयारीला लागा
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 8:54 AM

मुंबई : तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा मार्चमध्ये होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखेबाबत आज (8 जानेवारी) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परिक्षा तर तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. (MPSC exams will be held in march , date will be announced soon)

कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे राज्यात प्रतिष्ठेचं वलय असणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या होत्या. अनेक वर्षांपासून तयारी करत असलेले उमेदवार या परीक्षांची वाट पाहत होते. अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. त्यामुळे एमपीएससीच्या परीक्षादेखील लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी या उमेदवारांकडून केली जात होती. त्याची दखल घेत, आता एमपाएससीची परीक्षा लवकरच घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार या परीक्षांबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखांची अधीकृत घोषणा आज केली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. तर दुय्याम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा याच वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे. या सर्व परीक्षांची अधिकृत घोषणा राज्य सरकारतर्फे आज ( शुक्रवार 8 जानेवारी) होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी परीक्षा पुढे ढकलण्याच निर्णय

दरम्यान मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यावेळी परीक्षा पुढे ढकलल्यामुळे कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यांनतर आता आज परीक्षेची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

रोहित पवारांचं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र; म्हणतात…

MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

(MPSC exams will be held in march , date will be announced soon)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.