Mumbai Rain Update : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, अवघ्या 10 दिवसात 11 वरून 40 टक्क्यांवर

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

Mumbai Rain Update : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, अवघ्या 10 दिवसात 11 वरून 40 टक्क्यांवर
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 3:34 PM

मुंबई : मागच्या काही दिवसात मुंबईत चांगलाच पाऊस बरसतोय. अश्यात सगळीकडेच पाणीच पाणी पाहायला मिळतंय. मुंबईला (Mumbai Rain Update) पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही वरूणराजाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे धरणांतील पाणीसाठाही चांगलाच वाढलाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील (Mumbai Water Supplying Dam) पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मागच्या केवळ दहा दिवसात 11 टक्क्यांवरून थेट 40 टक्क्यांवर हा पाणीसाठा पोहोचला आहे. या सातही तलावांचा एकत्रित पाणीसाठा 5.8 लाख दशलक्ष लिटर किंवा वार्षिक एकूण पाणीसाठ्याच्या 40% इतका झाला आहे. त्या तुलनेत गेल्या वर्षी 11 जुलै रोजी एकूण 17.6% इतकाच होता. सध्या चांगला पाऊस होतोय. त्यामुळे बीएमसीने मुंबईसाठी 27 जून रोजी लागू केलेली 10% पाणीकपात मागे घेतली आहे. पण तरीही धरणं फुल्ल भरेपर्यंत पाण्याचा जपून वापर करणं गरजेचं आहे.

धरणाच्या पाणी साठ्यात वाढ

भरपावसात मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण मागच्या काही दिवसात मुंबईत चांगलाच पाऊस बरसतोय. अश्यात सगळीकडेच पाणीच पाणी पाहायला मिळतंय. पण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही वरूणराजाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे धरणांतील पाणीसाठाही चांगलाच वाढलाय. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मागच्या केवळ दहा दिवसात 11 टक्क्यांवरून थेट 40 टक्क्यांवर हा पाणीसाठा पोहोचला आहे. या सातही तलावांचा एकत्रित पाणीसाठा 5.8 लाख दशलक्ष लिटर किंवा वार्षिक एकूण पाणीसाठ्याच्या 40% इतका झाला आहे.

कुठून किती पाणी पुरवठा?

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. भातसा धरणातून 48% , अप्पर वैतरणा 16% , मध्य वैतरणा 12%, मोडक सागर 11% आणि तानसा 10% मधून पाणीपुरवठा मुंबईला केला जातो. तुळशी आणि विहार ही धरणं मुंबई शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या फक्त 1-2% गरजा भागवतात. मुंबई जुलैमध्ये 855 मिमी पावसाची नोंद लवकरच होऊ शकते. सोमवारी सकाळपर्यंत 823 मिमी पावसाची नोंद झाली होती.

हे सुद्धा वाचा

खडकवासला धरणही भरलं

खडकवासला धरण 100 टक्के भरले असल्याने धरणाच्या सांडव्यातून सुरू विसर्ग वाढवून दुपारी 1 वाजता 11 हजार 900 क्युसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी-जिल्हा प्रशासनाचे आवाहन केले आहे. राज्यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस असल्यामुळे खडकवासला धरणात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आज तर चक्क धरण भरल्याने पुणेकरांसाठी आनंदाचा क्षण आहे. कारण खडकवासला धरणातून पुणेकरांना पाणी पुरवलं जातं.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.