AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चिप? पाकिस्तानच्या क्रिकेट तज्ज्ञाने केली अजब मागणी

आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत 357 धावा केल्या आहेत. इतकंच काय तर 32 षटकार मारले आहेत. त्याची खेळी पाहून पाकिस्तानातही खळबळ उडाली आहे.

वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चिप? पाकिस्तानच्या क्रिकेट तज्ज्ञाने केली अजब मागणी
वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चिप? पाकिस्तानचा क्रिकेट तज्ज्ञाने केली तपासणीची मागणीImage Credit source: PTI
| Updated on: Apr 27, 2026 | 8:14 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भल्याभल्या गोलंदाजांना घाम फुटला आहे. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 36 चेंडूत शतक ठोकलं. त्याची फलंदाजी पाहून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. इतक्या कमी वयात इतकं सगळं करणं सोपं नाही. त्यामुळे अनेकांनी त्याच्या वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पण यात कुठेच काही आढळलं नाही. आता वैभव सूर्यवंशीच्या बॅटची तपासणी करण्याची मागणी होत आहे. पाकिस्तानात तर त्याच्या बॅटमध्ये चिप असल्याची हास्यास्पद चर्चा रंगली आहे. वैभव सूर्यवंशीचे फटके पाहून पाकिस्तानचा क्रिकेट तज्ज्ञ नौमान नियाजने हास्यास्पद संशय व्यक्त केला आहे. त्याचा संशय आणि डोकं पाहून हसायला येणं सहाजिकच आहे. नौमानने मस्करीतच सांगितलं की, 15 वर्षीय युवा खेळाडू एआय चिप असलेल्या बॅटने फलंदाजी करत आहे. तेव्हाच इतक्या जोरात फटकेबाजी करताना दिसत आहे.

वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये चिप आहे का?

नौमान नियाजने वैभव सूर्यवंशीबाबत आपल्या कार्यक्रमात सांगितलं की, ‘जरा विचार करा.. हा कोणत्या प्रकारचा मुलगा आहे. त्याची बॅट तपासली पाहीजे. त्याची बॅट लॅबमध्ये पाठवली पाहीजे. मला वाटतं की त्याच्या बॅटमध्ये एआय चिपचा वापर केला गेला आहे. काय खेळाडू आहे. जेव्हा तुम्ही 18 वर्षांचे होते तेव्हा तुमचे बायसेप्स आणि ट्रायसेप्स होतात. हा खेळाडू 15 वर्षांचा आहे. हा खेळाडू जेव्हा जन्माला तेव्हा विराट कोहली वर्ल्ड चॅम्पियन होता. वैभव सूर्यवंशीच्या मनगटात जोर आहे. तो 360 डिग्रीचा वापर करतो.’

वैभव सूर्यवंशी कोणताही गोलंदाज समोर असला की आक्रमण करायला घाबरत नाही. त्याने दिग्गज गोलंदाजांना चौकार षटकार मारले आहेत. आयपीएल स्पर्धेतील आठ सामन्यात त्याने 357 धावा केल्या आहेत. त्याची बॅटिंग एव्हरेज हा 44.6 चा आहे. तसेच स्ट्राईक रेट हा 234.86 चा आहे. त्याने आतापर्यंत एक शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली आहेत. त्याने सर्वाधिक 32 षटकार मारले आहेत. वैभव सूर्यवंशी उर्वरित सामन्यातही अशीच कामगिरी करण्याची शक्यता आहे. कारण वैभव सध्या जबरदस्त फॉर्मात आहे.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है