AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : मुंबईला मोठा धक्का, दुखापतीमुळे मॅचविनर खेळाडू स्पर्धेतून आऊट, कुणाचा समावेश?

Mumbai Indians Keshav Maharaj Replaced Mitchell Santner IPL 2026 : मुंबई इंडियन्सला 19 व्या मोसमात काही खास करता आलेलं नाही. त्यात मुंबईच्या बॉलिंग ऑलराउंडरला दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर व्हावं लागलं आहे. जाणून घ्या कोणता खेळाडू स्पर्धेतून बाहेर झालाय आणि कुणाला संधी मिळालीय.

IPL 2026 : मुंबईला मोठा धक्का, दुखापतीमुळे मॅचविनर खेळाडू स्पर्धेतून आऊट, कुणाचा समावेश?
Mumbai Indians Wankhede StadiumImage Credit source: Bcci
| Updated on: Apr 27, 2026 | 8:56 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सला मोठा झटका लागला आहे. मुंबईचा ऑलराउंडर मिचेल सँटनर याला दुखापतीमुळे आयपीएलच्या 19 व्या मोसमातून (IPL 2026) बाहेर व्हावं लागलं आहे. सँटनरला वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यात फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. सँटनरला या दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर व्हावं लागलं आहे. आयपीएलकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच मुंबईकडून मिचेल सँटनर याच्या जागी बदली खेळाडूचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. सँटनरच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू केशव महाराज याचा समावेश करण्यात आला आहे.

सँटनरला काय झालं?

मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात 23 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात आला. सँटनरला या सामन्यात बाउंड्री लाईनजवळ असताना कॅच घेताना खांद्याला दुखापत झाली होती. सँटनरला या दुखापतीमुळे आता बाहेर व्हावं लागलं आहे. तर मुंबईने केशवला 75 लाख रुपयांत आपल्या गोटात घेतलं आहे.

सँटनरची 19 व्या मोसामातील कामगिरी

सँटनरला या मोसमात मुंबईकडून 7 पैकी 4 सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. सँटनरने या 4 सामन्यांत 25 च्या सरासरीने आणि 8.92 च्या इकॉनमी रेटने 5 विकेट्स मिळवल्या. तसेच सँटनरला बॅटिंगने काही खास करता आलं नाही. सँटनरने 2 डावांत एकूण 26 धावा केल्या.

केशव महाराजची एन्ट्री

मिचेलच्या दुखापतीमुळे आता केशवला आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघात संधी मिळाली आहे. केशव याआधी आयपीएल स्पर्धेत खेळलाय. मात्र त्याला या स्पर्धेचा फारच कमी अनुभव आहे. केशवने 2024 साली 2 सामन्यांत राजस्थान रॉयल्सचं प्रतिनिधित्व केलं होतं. केशवने या 2 सामन्यांत 2 विकेट्स मिळवल्या होत्या. तसेच केशवने टी 20 कारकीर्दीत 218 सामन्यांमध्ये 191 विकेट्स मिळवल्या आहेत.

हनुमान भक्त केशव महाराजची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री

मुंबईचा पुढील सामना कधी?

दरम्यान मुंबईचा या मोसमातील आठवा सामना हा 29 एप्रिलला होणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे.

मुंबई इंडियन्सचा सुधारित संघ : हार्दिक पंड्या (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, केशव महाराज, जसप्रीत बुमराह, क्रिश भगत, अल्लाह गझनफर, अश्वनी कुमार, विल जॅक्स, राज बावा, शार्दुल ठाकूर, दानिश मालेवार, मयंक रावत, कॉर्बिन बॉश, रघु शर्मा, रोहित शर्मा, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडे, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ आणि मोहम्मद सलाहुद्दीन इझार.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है