मुंबई : राज्यातील कोरोनाची बिकट परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 15 दिवस ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले होते. पण तरीही राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. अशावेळी राज्यात कडक लॉकडाऊनचा निर्णय झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या त्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यावेळी मुख्यमंत्री कडक लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर करतील असंही टोपे यांनी सांगितलंय. तसंच लसीकरणाबाबत महाराष्ट्राचा अॅक्शन प्लान ठरल्याचंही टोपेंनी सांगितलं. परदेशातून लसी मागवल्या जाणार असल्याचं टोपे म्हणाले. (Maharashtra government corona vaccination plan Demand for vaccine from other countries)