
मुंबई म्हणजे मधुबाला, ऐश्वर्या राय असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. बॉलिवूडच्या या दोन अशा नट्या आहेत, ज्यांच्या सौंदर्याची आजही तितकीच चर्चा होते. लाखो लोकांना या अभिनेत्रींच आकर्षण होतं. मुंबईच सुद्धा तसंच आहे. मुंबई हे घड्याळाच्या काट्यावर धावणारं शहर. पहाटे चारपासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत तुम्हाला मुंबईत लगबग दिसेल. मुंबई कधी थांबत नाही. मुंबईत सध्या धावपळ, दगदग प्रचंड वाढली आहे. पण, तरीही मुंबईच आकर्षण अजिबात कमी झालेलं नाही. मुंबईची लोकसंख्या कोट्यवधीच्या घरात आहे. येणारा प्रत्येकजण या शहराच्या प्रेमात पडतो, ही या शहराची खासियत आहे. म्हणूनच प्रेमाने आपली मुंबईच म्हणतात. मुंबई हे सात बेटांवर वसलेलं शहर होतं. याला मूळ मुंबई म्हणतात. बॉम्बे बेट (डोंगरी ते मलबार हिलचा भाग), ओल्ड वुमन्स बेट (लिटिल कुलाबा), कुलाबा म्हणजे कँडील बेट, परळ, माझगाव, वरळी आणि माहीम अशी मिळून सात बेटांपासून मुंबई तयार झाली. आता याच मुंबईचा विस्तार दहीसर, बोरीवलीपर्यंत झाला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 1881 साली ब्रिटिशांनी भारतात जनगणना केली, त्यावेळी मुंबईत लोकसंख्या फक्त...