
लोकसभेप्रमाणेच विधानसभेची निवडणुकही जातीय समीकरणांभोवती फिरण्याची चिन्हं निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा तर महायुतीला गुलीगत धक्का दिला. राज्यात कुठचं उमेदवार उभं न करण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. या भूमिकेने राज्यातील सत्ता समीकरणावर मोठा परिणाम दिसत आहे. राजकीय गणितं यामुळे विस्कटण्याची आणि काही पक्षांना थेट फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या निर्णयाचे वेगवेगळ्या चष्म्यातून विश्लेषण सुरू आहे. पण यामुळे लोकसभेचा पॅटर्न विधानसभेत रिपीट होतो की काय अशा भीतीने काही उमेदवारांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे, हे सांगायला ज्योतिषाची नक्कीच गरज नाही. भाजपासाठी किती फायदा-किती तोटा ...