AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahatma Gandhi : नथुराम गोडसेने किती वेळा राष्ट्रपिता महात्मा गांधींना मारण्याचा प्रयत्न केला?

Mahatma Gandhi Punyatithi : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला आज 76 वर्षे झाली आहे. 30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधी यांची हत्या झाली. पण नथुराम गोडसेकडून याआधीही हत्येचे प्रयत्न केले गेले. महाराष्ट्रातील 4 ठिकाणी मारण्याचा प्रयत्न झाले, तेव्हा महात्मा गांधींनी महत्वाचं आवाहन केलं...

Mahatma Gandhi : नथुराम गोडसेने किती वेळा राष्ट्रपिता महात्मा गांधींना मारण्याचा प्रयत्न केला?
| Updated on: Jan 30, 2024 | 11:06 AM
Share

मुंबई | 30 जानेवारी 2024 : महात्मा गांधी… ज्यांचं नाव जरी घेतलं, तरी मनात आदर निर्माण होतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आज स्मृतिदिन… महात्मा गांधी यांच्या हत्येला आज 76 वर्षे पूर्ण झाली आहेत. 30 जानेवारी 1948 या दिवशी नथुराम गोडसेने गोळ्या झाडून महात्मा गांधी यांची हत्या केली. गांधींसारख्या शांतीप्रिय माणसाची हत्या होणं ही भारताच्या इतिहासातील अप्रिय घटना होती. या हत्येनंतर भारताच्या सामाजिक जीवनावर परिणाम झाले. पण 30 जानेवारी आधीही नथुराम गोडसेने महात्मा गांधींच्या हत्येचे प्रयत्न केले होते. सतत होणाऱ्या हल्ल्यांनंतर महात्मा गांधी यांनी महत्वाचं आवाहन केलं होतं.

गांधीजींची हत्या

30 जानेवारी 1948 यांची हत्या झाली. पण त्या घटनेच्या 10 दिवस आधी गोडसे आणि त्याच्या साथीदारांनी महात्मा गांधींवर हल्ला केला होता. दिल्लीतील बिर्ला हाऊस या ठिकाणी महात्मा गांधींवर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यातून महात्मा गांधी बचावले. पण पुढे दहाच दिवसात महात्मा गांधी यांच्यावर पुन्हा हल्ला झाला. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यात महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला. गांधींच्या हत्येने देश शोकसागरात बुडाला.

महाराष्ट्रात गांधींवर हल्ला

पुणे टाऊन हॉल परिसरातही महात्मा गांधी यांच्यावर हल्ला झाला. गांधीजींच्या गाडीवर हँडग्रेनेड टाकण्यात आलं. पण हे ग्रेनेड गाडीच्या बॉनेटवर पडलं. गाडीच्या बाजूला या ग्रेनेडचा स्फोट झाला. या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नाही. महाबळेश्वरमधील पाचगणीमध्येही महात्मा गांधींवर हल्ला झाला. वर्ध्यातील सेवाग्राममध्येही महात्मा गांधींवर युवकाने हल्ला केला.

गांधीजींचं आवाहन काय?

1945 साली महात्मा गांधी मुंबई ते पुणे असा रेल्वे प्रवास करत होते. रात्रीच्या वेळी कसारा घाटात ही रेल्वे पोहोचली तेव्हा या रेल्वे रूळांवर लाकडाचे ओंडके, दगडाचे ढीग ठेवण्यात आले होते. रेल्वे चालकाला हा अडथळा दिसला. त्याने जोरात ब्रेक दाबला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या सगळ्यानंतर गांधीजी पुण्यात आले. तेव्हा हल्लेखोरांना गांधीजींनी आवाहन केलं. ज्यांना मला मारायचं आहे, त्यांनी मारावं. पण त्यामुळे माझ्यासोबतच्या लोकांना इजा पोहचवू नये, असं महात्मा गांधी म्हणाले होते.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.