AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BIG BREAKING : रात्र महत्त्वाची, अमित शाह ‘सह्याद्री’वर दाखल, शिंदे-फडणवीसही पोहोचले, काय घडतंय?

अमित शाह मुंबई दौऱ्यासाठी मुंबईत दाखल होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिग्गज नेते सह्याद्रीवर दाखल झाले आहेत.

BIG BREAKING : रात्र महत्त्वाची, अमित शाह 'सह्याद्री'वर दाखल, शिंदे-फडणवीसही पोहोचले, काय घडतंय?
अमित शाह
| Edited By: Chetan Patil | Updated on: Sep 08, 2024 | 9:37 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अफाट घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. अमित शाह यांचा ताफा मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाला आहे. अमित शाह यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह यांची आज महायुतीच्या नेत्यांसोबतही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांच्या उपस्थितीत आज लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव या विषयावर विश्लेषण होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती काय नवीन गणितं आखणार आहे? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

अमित शाह यांचा सह्याद्री अतिथीगृहात आज मुक्काम

अमित शाह यांचा आजचा मुक्काम हा सह्याद्री अतिथीगृहावर असणार आहे. अमित शाह यांना भेटण्यासाठी भाजपचे अनेक दिग्गज नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रविंद्र चव्हाण असे अनेक दिग्गज नेते अमित शाह यांच्या भेटीला आले आहेत.

महायुतीच्या बैठकीत कोणत्या चर्चा होणार?

महायुतीच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना सारख्या अनेक लोकपयोगी योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत प्रचारामध्ये कोणकोणते मुद्दे असावेत, विधानसभेसाठी जागावाटप कसं असावं, याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना