AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26/11 मुंबई दहशतवादी हल्लाप्रकरणात मोठी अपडेट; तहव्वुर राणा याला भारतात आणणार, कुटनीतीच्या यशानंतर मोठे पाऊलं

26/11 Mumbai terror attack Tahawwur Rana : 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानी वंशाच्या कॅनडातील व्यापारी तहव्वुर राणा प्रकरणात भारताच्या कुटनीतीला मोठे यश आले. अमेरिकन न्यायालयात त्याला चांगलाच झटका बसला आहे.

26/11 मुंबई दहशतवादी हल्लाप्रकरणात मोठी अपडेट; तहव्वुर राणा याला भारतात आणणार, कुटनीतीच्या यशानंतर मोठे पाऊलं
मुंबई दहशतवादी हल्ला, तहव्वुर राणा
| Updated on: Jan 01, 2025 | 11:47 AM
Share

26/11 मुंबई दहशतवादी हल्ला भारतीय विसरले नाहीत. या हल्ल्यातील पाकिस्तान वंशांचा कॅनडातील व्यापारी तहव्वुर राणा याला लवकरच भारताकडे सोपवण्यात येणार आहे. भारतीय कुटनीतीचा हे मोठं यश मानण्यात येत आहे. त्याला भारतात आणण्यासाठी आता कायदेशीर बाबींसोबतच राजकीय संबंधांचा वापर करण्यात येत आहे. अमेरिकन कोर्टाने राणाची याचिका फेटाळल्यानंतर त्याला मोठा झटका बसला होता. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकन न्यायालयाने प्रकरणात फैसला सुनावला होता. भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण संधी अंतर्गत त्याला भारताला सोपवण्यास न्यायालयाने मंजूरी दिली होती. त्यातंर्गतच आता राणाला लवकरच भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

राणावरील आरोप काय?

मुंबई हल्ल्यात तहव्वुर राणा याचा हात असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले होते. दोषारोपपत्रात सुद्धा त्याचे नाव आहे. तो पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेज इंटेलिजेंस(ISI) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तयब्बाचा सक्रिय सदस्य असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड डेव्हिड कोलमॅन हेडली याला राणा याने या हल्ल्यासाठी मदत केल्याचे तपासात समोर आले होते. त्याने हल्ल्यापूर्वी मुंबईतील काही ठिकाणांची रेकी केली होती, असा आरोप आहे.

हल्ल्याच्या एका वर्षानंतर अटक

26/11 मुंबई हल्ल्यानंतर एका वर्षानंतर FBI ने शिकागो येथून राणा याला अटक केली होती. राणा आणि त्याचा मित्र डेव्हिड कोलमन हेडली या दोघांनी मुंबईतली हल्ल्याच्या ठिकाणांची रेकी केली होती. त्यानंतर दहशतवाद्यांनी हे हल्ले केल्याचे तपासात समोर आले होते.

अमेरिकन कोर्टाने भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रर्त्यापण करारात राणा याला नियमांच्या अपवादाचा लाभ देता येणार नाही असे स्पष्ट केले होते. अमेरिकन न्यायालयात राणा विरोधात जो खटला सुरू आहे, तो भारतातील खटल्यांपेक्षा वेगळा असल्याचे मत कोर्टाने व्यक्त केले होते. त्यामुळे नॉन बिस इन आयडम बाबत आरोपीने केलेला युक्तीवाद कोर्टाने ग्राह्य धरला नाही. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकन न्यायालयाने प्रकरणात फैसला सुनावला होता. भारत-अमेरिका या दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण संधी अंतर्गत त्याला भारताला सोपवण्यास न्यायालयाने मंजूरी दिली होती. त्यातंर्गतच आता राणाला लवकरच भारतात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.