कोरोनापाठोपाठ मुंबईवर मलेरियाचे संकट, गेल्यावर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ

मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच दुसरीकडे मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत (Malaria Patient increase Mumbai)  आहे.

कोरोनापाठोपाठ मुंबईवर मलेरियाचे संकट, गेल्यावर्षीच्या तुलनेत रुग्णसंख्येत वाढ
जाणून घ्या वर्ल्ड मलेरिया डे चा इतिहास, महत्त्व आणि थीमबद्दल

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत मलेरियाचं संकट वाढताना दिसत आहे. मुंबईत एकीकडे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच दुसरीकडे मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मुंबईत एकट्या ऑगस्ट महिन्यात 1 हजार 137 जणांना मलेरियाची लागण झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. (Malaria Patient increase Mumbai)

मुंबईत गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे 824 रुग्ण आढळले होते. मात्र यंदा ऑगस्टमध्ये तब्बल 1 हजार 137 जणांना मलेरियाची लागण झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे पावसाळी आजारांचाही धोका वाढत आहे.

दरम्यान गेल्यावर्षी जुलै महिन्यात 438 मलेरियाचे रुग्ण सापडले होते. यंदाही संख्या दुप्पट झाली आहे. यंदा जुलै महिन्यात मलेरियाचे 872 रुग्ण सापडले होते. धक्कादायक बाब म्हणजे मलेरियामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

तसेच डेंग्यू रुग्णांची संख्याही गेल्यावर्षीच्या तुलनेने कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे 134 रुग्ण होते. आता डेंग्यूचे केवळ 10 रुग्ण आहेत. त्याशिवाय मुंबईत गॅस्ट्रोचे रुग्णही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत. गेल्यावर्षी ऑगस्ट मध्ये 623 रुग्ण होते. यंदा ऑगस्टमध्ये फक्त 53 केसेस आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात मलेरियाची रुग्णसंख्या तुलनेने दुप्पट होत असते. यंदाही मलेरिया रुग्णांचा आकडा दुप्पट झाला आहे. तसेच यंदा दोन जणांचा मलेरियाने मृत्यू झाला आहे. शिवाय कोरोनाचं संकटही पूर्णपणे ओसरलेलं नाही. त्यामुळे मलेरिया रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयांवर ताण येणार असून उपचारासाठी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. (Malaria Patient increase Mumbai)

संबंधित बातम्या :

कोरोना पाठोपाठ मुंबईवर आता ‘या’ आजाराचं संकट, दोघांचा मृत्यू

मुंबई कोरोनामुक्त होण्यासाठी नेमके किती दिवस लागतील?

Published On - 10:33 am, Wed, 2 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI