मुंबईतील मॉल्स पुन्हा बंद ! सरकारच्या या निर्णयामुळे मालकांवर नामुष्की

शासनाने अटी शर्थींवर मॉल्स सुरु करण्याची परवानगी दिल्यानंतरही मुंबई आणि उपनगरातील मोठमोठे मॉल्स अद्याप बंद आहेत. फिनिक्स, आरसीटी, इनऑर्बिट यासारखे मोठे अद्याप बंदच आहेत.

मुंबईतील मॉल्स पुन्हा बंद ! सरकारच्या या निर्णयामुळे मालकांवर नामुष्की
मुंबईतील मॉल्स पुन्हा बंद ! सरकारच्या या निर्णयामुळे मालकांवर नामुष्की

मुंबई : कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्याने शासनाकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले. काही अटी शर्थींसह राज्यातील सर्व दुकाने आणि मॉल्स सुरु ठेवण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली. मात्र सरकारने लादलेल्या अटींमुळे बहुतांश मॉल्स पुन्हा बंद होत आहेत. मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण घेऊन 14 दिवस होणे आवश्यक असल्याची अट सरकारने घातली आहे. मात्र दुकानातील सर्वच कर्मचाऱ्यांचं लसीकरण अद्याप पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे मॉलमधील सर्व दुकाने अद्याप बंदच आहेत. (Malls in Mumbai closed again, This decision of the government brought disgrace on the owners)

मुंबईतील मॉल्स बंद

शासनाने अटी शर्थींवर मॉल्स सुरु करण्याची परवानगी दिल्यानंतरही मुंबई आणि उपनगरातील मोठमोठे मॉल्स अद्याप बंद आहेत. फिनिक्स, आरसीटी, इनऑर्बिट यासारखे मोठे अद्याप बंदच आहेत. मॉलमधील बहुतेक कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण झाले नसल्याने मॉल्स बंद ठेवण्याची नामुष्की मॉल्स मालकांवर ओढवली आहे.

15 ऑगस्टपासून निर्बंध करण्यात आले शिथिल

हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानं, विवाह सोहळे यांच्याबाबतही मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासाठी रात्री 10 पर्यंतची अट आहे, तसेच दोन डोस आवश्यक आहे. सर्व शॉपिंग मॉलवरीलही निर्बंध शिथिल करण्यात आले आणि मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली. मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली होणार असून सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत परवानगी देण्यात आली. हॉटेल 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 पर्यंत खुले करण्यात आले. यासाठी हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरणाची अट आहे. सर्व दुकाने रात्री 10 पर्यंत खुली करण्यात आली. यासाठी दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण घेऊन 14 दिवस होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. (Malls in Mumbai closed again, This decision of the government brought disgrace on the owners)

इतर बातम्या

‘बिंदू नामावलीनुसार धनगर समाजातील विद्यार्थ्यांना जागा द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु’, पडळकरांचा इशारा

मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा ‘टाईमपास’ आता बंद करा, उदयनराजेंचा घणाघात

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI