मुंबई विमानतळावर तरुणाची आत्महत्या

मुंबई विमानतळावर तरुणाची आत्महत्या

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्तर प्रदेश येथून आलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. अक्षय राजवीर (31) असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने विमानतळावरील एका इमारतीवरुन उडी मारली. या तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेल नाही. या घटनेचा सांताक्रुझ पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 जवळ शनिवारी सकाळी अक्षय गेला. विमानतळावर पोहोचल्यानंतर अक्षयने आपल्या कुटुंबियांना फोन लावून बोलावले. आई वडील आल्यानंतर त्याने विमानतळावरील एका इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली.

यावेळी घटना स्थळाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे, “माझ्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही”, असं अक्षयने या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. या घटनेमुळे काही काळ विमानतळ परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान अक्षयच्या आत्महत्येनंतर तो जेट एअरवेजचा कर्मचारी असल्याचे मेसेज व्हायरल झाले होते. मात्र अक्षय जेटएअरवेजचा कर्मचारी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अक्षय दोन दिवसांपूर्वी गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथून मुंबईत आला होता. दोन वर्षापासून तो मानसिक तणावाखाली होता.

Published On - 8:59 am, Sun, 12 May 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI