Video : मी सीनिअर असूनही… मनिषा कायंदे यांची खदखद, ठाकरे गटात कुणाचा होता त्रास?; पहिल्यांदाच मोठा खुलासा

मी शिवसेनेत होते. बाळासाहेबांच्या उपस्थित पक्षात प्रवेश केला. आताही मी शिवसेनेतच आहे. फक्त नेतृत्वात बदल झाला आहे. अधिकृत शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

Video : मी सीनिअर असूनही... मनिषा कायंदे यांची खदखद, ठाकरे गटात कुणाचा होता त्रास?; पहिल्यांदाच मोठा खुलासा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 12:47 PM

मुंबई : शिवसेनेत दहा वर्ष काम केल्यानंतर आमदार मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनिषा कायंदे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी का दिली? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. मनिषा कायंदे यांची विधान परिषदेची टर्म संपत आहे, त्यामुळे त्या शिंदे गटात आल्याचं सांगितलं गेलं. कायंदे यांच्या मतदारसंघात मोठा निधी मिळाला म्हणून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र, या दोन्ही कारणात काही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. आपण पक्ष का सोडला याची खदखदच मनिषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे. कायंदे यांनी अप्रत्यक्षपणे पक्ष सोडण्याचं खापर ठाकरे गटातील एका महिला नेत्यावर फोडलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मनिषा कायंदे यांनी मीडियाशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली बाजू मांडतानाच मनातील खंत आणि खदखदही व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी मला संभाजीनगरचं महिला संपर्क प्रमुख केलं. विदर्भातही दोन जिल्हे दिले. पण त्यानंतर माझ्यासारख्या सीनियर व्यक्तीला जबाबदारी दिल्यानंतर एखादी ज्युनिअर व्यक्ती तिथे आली. ही ज्युनिअर व्यक्ती मला डिक्टेट करायची. याबाबत मी पक्षातील नेत्यांशी बोलले. त्यांच्याकडे तक्रार केली. पण माझं बोलणं काही सीरिअसली घेतलं नाही. माझी ती खंत होती, असं मनिषा कायंदे यांनी सांगितलं. मनिषा कायंदे यांना डिटेक्ट करणारी ती महिला नेता कोण? अशी चर्चा आता रंगली आहे.

मी काय मागत होते?

पक्ष कार्यकर्त्यांना मनमोकळेपणे बोलता आलं पाहिजे. पक्षात कुचंबना होता कामा नये. मग कुचंबना झाल्यावर इकडे तिकडे बोलतो. मग मीडियात छुप्या पद्धतीने बोललं जातं. माझी अडचण मी सर्व नेत्यांना सांगितली. पण कुणी ऐकलं नाही. विधान परिषदेचे माझे दोन वर्ष बाकी आहेत. मला अंगिकृत संघटनेचं काम द्या. महिला आघाडीचं काम द्या. मी काम मागत होते? पक्षातील लोक सोडून जात असताना आम्ही करण्याची संधी मागत होतो. ती दिली नाही, असं कायंदे म्हणाल्या.

पक्ष बदलला नाही, नेतृत्वात बदल झाला

मी उद्धव ठाकरेंसोबत काम करत होते. त्यांनी मला विधान परिषद दिली. मान सन्मान दिला. मी 2012मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेबांची शिवसेना होती. मी आताही शिवसेनेत आहे. नेतृत्वात बदल झाला आहे. अधिकृत शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहे. मी पक्ष बदल केला नाही, असं त्या म्हणाल्या. माझा राजकीय प्रवास मोठा आहे. मी भाजपमध्ये 25 वर्ष काम केलं.

मी मतदार म्हणून सर्वात आधी शिवसेनेला मतदान केलं आहे. माझं मतदान नेहमीच शिवसेनेला राहिलं आहे. मी सतत शिवसेनेचं काम केलं. भाजप आणि शिवसेनेची विचारधारा समानच होती. त्यामुळे भाजपमधून शिवसेनेत आल्यावर माझी विचारधारा तीच राहिली. माझ्या शिवसेना प्रवेशाने कुणाच्या भुवया उंचावल्या नाही, असं त्या म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.