पोलीस, पत्रकारांकडून चौकशीच्या नावाखाली होणारा छळ थांबवा, मनसुख हिरेन यांची मुख्यमंत्री,गृहमंत्र्यांकडे तक्रार

मनसुख हिरेन यांनी मानसिक छळ होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाणे पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे  केली होती. (Mansukh Hiren)

पोलीस, पत्रकारांकडून चौकशीच्या नावाखाली होणारा छळ थांबवा, मनसुख हिरेन यांची मुख्यमंत्री,गृहमंत्र्यांकडे तक्रार
मनसुख हिरेनची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे तक्रार
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 11:38 PM

मुंबई: मनसुख हिरेन यांनी मानसिक छळ होत असल्याची तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, ठाणे पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे  केली होती. या तक्रारी मध्ये मनसुख हिरेन यांनी घडलेला सगळा घटनाक्रम मांडला आहे. मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात विक्रोळी पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझे,एनआयए, घाटकोपर पोलीस स्टेशन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एका पत्रकाराच्या नावाचा समावेश आहे. (Mansukh Hiren wrote letter to Chief Minister Home Minister Mumbai and Thane CP for protection from Harassment from Police and News Reporters )

मनसुख हिरेन यांच्या तक्रारपत्रात काय?

मनसुख हिरेन यांनी त्यांच्या 17 फेब्रुवारीला सांयकाळी 6 वाजता ठाणेवरुन मुंबईला येताना स्कॉर्पिओ नंबर MH02 AY 2815 या गाडीमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानं ती ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील नाहुर उड्डाणपुलाजवळ ती पार्क केली असं म्हटलंय. 18 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता गाडी पार्क केलेल्या ठिकाणी मेकॅनिकसह पोहोचलो असता स्कॉर्पिओ तिथं आढळून आली नाही. त्यामुळे विक्रोळी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली.

25 फेब्रुवारीला रात्री 11 वाजता पोलीस हिरेनच्या घरी

25 फेब्रुवारीला रात्री 11 वाजता 2 ते 3 एटीएसचे पोलीस माझ्या घरी आले त्यांनी स्कॉर्पिओ गाडी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक भरलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती दिली. यामुळे धक्का बसल्याचं मनसुख हिरेन म्हणतात. एटीएसच्या पोलिसांनी चौकशी केली आणि ते निघून गेले. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्याचे 4 ते 5 पोलीस रात्री 11.45 वाजता 4 ते 5 पोलीस घरी आले आणि चौकशी करुन निघून गेले. त्यानंतर 26 फेब्रुवारीला मध्यरात्री 2 वाजता विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस आले आणि घेऊन गेले सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी ताब्यात ठेवले आणि त्यानंतर घरी सोडले.

27 फेब्रुवारीला काय घडलं?

मनसुख हिरेन यांनी तक्रारीत पुढं म्हटलय की, 27 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता विक्रोळी पोलीस ठाण्यातून फोन आला. त्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यातून 3 वाजता फोन आला. 1 मार्चला सायंकाळी 4 वाजता नागपडा एटीएसमधून फोन आला. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू ऑफिसमध्ये बराच वेळ चौकशी करण्यात आली. बराच वेळ परत परत प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एनआयएनं चौकशी केली. जॉईंट सी.पी.भाम्रे यांनी चौकशी केली. विविध तपास यंत्रणांकडून झालेल्या चौकशीमुळे मानसिक स्वास्थ बिघडल्याचं मनसुख हिरेन यांनी तक्रारीत म्हटलंय. बऱ्याच माध्यमांच्या पत्रकारांकडून वारंवार फोन येत आहेत. एका पत्रकारानं फोन करुन या प्रकरणातील संशयित असल्याचं सागिंतल्याचं मनसुख हिरेन यांनी सांगितले.

पोलीस आणि पत्रकारांचा त्रास?

मनसुख हिरेन यांनी मुख्यंमत्री आणि गृहमंत्री यांना लिहिलेल्या पत्रात पोलीस आणि पत्रकारांना छळ करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं म्हटलंय. पोलिसांकडून वारंवार होणाऱ्या चौकशीच्या त्रासापासून संरक्षण मिळावं, अशी मागणी मनसुख हिरेन यांनी केली आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाला पोलीस आणि पत्रकारांकडून होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी, असं मनसुख हिरेन यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या:

Video: मनसुख हिरेन यांच्या तोंडावर एवढे रुमाल कसे? घातपाताचा संशय वाढणारा तो व्हिडीओ प्रत्यक्ष बघाच!

Mansukh Hiren | मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत, निष्पक्ष चौकशी व्हावी, पत्नी विमल हिरेन यांची प्रतिक्रिया

(Mansukh Hiren wrote letter to Chief Minister Home Minister Mumbai and Thane CP for protection from Harassment from Police and News Reporters )

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.