AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याला लग्नाची इच्छा खूपच महाग पडली, एकाचवेळी दोघांनी..

लग्न करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. पूर्वी लग्न ही घरी बैठका घेऊन जुळायची. पण आता काळ बदलला आहे. लग्न आता ऑनलाइन जुळतात. मंत्रालयात अधिकारी पदावर काम करणाऱ्या एका महिलेला लग्नाची ही इच्छा खूपच महाग पडली आहे.

मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याला लग्नाची इच्छा खूपच महाग पडली, एकाचवेळी दोघांनी..
Mantralaya
| Updated on: Oct 09, 2026 | 9:21 AM
Share

सध्या सगळ्याच गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. फक्त वस्तू, जेवणच ऑनलाइन मागवता येत नाही, तर अगदी लग्न सुद्धा ऑनलाइन जुळतात. पूर्वीपेक्षा काळ आता बदलला आहे. लग्न जुळवणारी अनेक ऑनलाइन वेबसाइट्स आल्या आहेत. या ऑनलाइन संकेतस्थळावर जुळलेली अनेक लग्न यशस्वी सुद्धा ठरतात. पण काहीवेळा फसवणूक सुद्धा होते. असाच प्रकार शादी डॉट कॉमवर झाला. यात मंत्रालयात अधिकारी पदावर काम करणाऱ्या महिलेची फसवणूक झाली. ‘शादी डॉट कॉम’वर नावनोंदणी करून लग्नासाठी नवरा मुलगा शोधणे मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकारी महिलेस भलतेच महागात पडले. दोन जणांनी त्यांना लग्नासाठी इच्छुक असल्याचे सांगत संपर्क साधून 17 लाख 97 हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

सीमा (नाव बदललेले) या मंत्रालयात एका विभागामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळांबर नाव नोंदणी केली होती. त्यानुसार सुनील नावाच्या व्यक्तीने त्यांना संपर्क साधला व त्याने यूकेचा नागरिक असल्याचे सांगत लग्न करायची इच्छा व्यक्त केली. त्याने सीमा यांचा विश्वास संपादन करून विविध कारणास्तव पैसे पाठविण्यास भाग पाडले. विशाल नावाच्या व्यक्तीनेही लग्नास इच्छुक असल्याची बतावणी केली.

इतकी रक्कम दोघांना ऑनलाईन पाठवली

त्याने तो कॅनडाचा रहिवासी असल्याचे सांगितले. त्यानेही वेगवेगळी कारणं सांगून सीमा यांना पैसे पाठविण्यास भाग पाडले. दोघांच्या भुलथापांना बळी पडत सीमा यांनी १७ लाख ९७ हजार इतकी रक्कम दोघांना ऑनलाईन पाठवली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दक्षिण प्रादेशिक विभाग सायबर ‘पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात तक्रार दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपीकडून पुन्हा दया याचिका

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात आरोपीकडून पुन्हा दया याचिका. सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील निवासस्थानी जानेवारी २०२५ मध्ये हल्ला झाला होता. बांगलादेशी आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम याने पुन्हा एकदा गुन्हा कबूल करण्याची तयारी दर्शवणारा आणि दयेची याचना करणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयात केला आहे.घटनेनंतर दोन दिवसांनी अटक करण्यात आलेला मोहम्मद शरीफुल इस्लाम सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शरीफुल याने असाच अर्ज यापूर्वीही केला मात्र त्यावेळी अतिरिक्त न्यायाधीश जी. पी. देशमुख य फेटाळला होता.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच