मनोज जरांगे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा! उद्यापासून कडक उपोषण; पाण्याच्या थेंबालाही… काय म्हणाले जरांगे?

मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून कडक उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मनोज जरांगे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा! उद्यापासून कडक उपोषण; पाण्याच्या थेंबालाही... काय म्हणाले जरांगे?
Manoj-Jarange
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Aug 31, 2025 | 12:34 PM

मुंबईतील आझाद मैदानात मराठ्यांचे आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आझाद मैदानात उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उद्यापासून कडक उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

‘कुणी रेनकोट, छत्र्या वाटत असतील तर एक रुपया देऊ नका. त्यांच्या छत्र्या, रेनकोट घेऊ नका. काही लोकांनी धंदा सुरू केला आहे. समाजाच्या नावाने कमवत आहेत. माझ्या नावावर कमावत आहेत. रेनकोट वाटपाच्या नावाखाली पैसे गोळे करू नका. शेवटचं सांगतो. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कुणालाही पैसे द्यायचे नाही. गरीबाची सेवा करा. लोकं ट्रक भरून घेऊन येत आहेत. कुणी नाव सांगत नाही. समाजाला मदत करायची सोडून पैसे छापायला बघत आहे’ असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

वाचा: पाणपोई बंद, स्वच्छतागृहांना लॉक, खाऊ गल्ल्याही बंद, मराठा आंदोलकांना…, रोहित पवारांचा गंभीर आरोप

‘उद्यापासून मी पाणी घेणार नाही’

उद्यापासून कडत उपोषण करणार असल्याचे सांगत मनोज जरांगे म्हणाले, ‘काल आणि आज मी पाणी प्यायलो. उद्यापासून मी पाणी घेणार नाही. पाणी बंद करणार आहे. सरकार ऐकत नाही. उपोषण कडक करणार. मराठा तरुणांनी मान खाली घालावी लागेल असं पाऊल उचलायचं नाही. सर्वांनी शांत राहायचं. यांनी कितीही अन्याय अत्याचार करू द्या. मी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. हा माझा शब्द आहे.’

पुढे ते म्हणाले, ‘काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली. तातडीने मार्ग काढा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत असं ऐकलं. मग ज्यांना आदेश दिले तर ते मार्ग का काढत नाही. उपसमितीला आदेश दिला. मग मार्ग का काढत नाही. हे लय भंगार आहेत. नुसत्या बैठका घेत आहेत. लय झाल्या बैठका.’