मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. (cm uddhav thackeray will meet pm narendra modi tomorrow)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंगळवारी पंतप्रधानांना भेटणार; मराठा आरक्षणावर होणार चर्चा
CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 2:20 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत मराठा आरक्षणावर होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे मोदी-ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (cm uddhav thackeray will meet pm narendra modi tomorrow)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती. पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करतील. यावेळी आघाडी सरकारमधील काही मंत्री त्यांच्यासोबत असतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

मराठा समाजाचं लक्ष

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यामध्ये उद्या मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मोदी-ठाकरे यांची पहिल्यांदाच भेट होत आहे. या भेटीतून मराठा आरक्षणावर मार्ग निघण्याची दाट शक्यता असल्याने त्याकडे संपूर्ण मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागलं आहे.

जयंत पाटलांचे संकेत

दरम्यान, कालच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मराठा आरक्षण प्रश्नी लवकरच पंतप्रधानांची भेट घेण्यात येणार असल्याचे संकेत दिले होते. ‘मराठा आरक्षणाला सगळ्या स्तरातून, वेगवेगळ्या संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत वेगळा निर्णय झाला. परंतु, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आता संसदेत याबाबत आवाज उठवण्याची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षण लागू करण्यासाठी आग्रह करणार आहे’, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली होती. (cm uddhav thackeray will meet pm narendra modi tomorrow)

 

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांचं मोठं विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार; कोरोना संकटावर बोलण्याची शक्यता

‘आशा’ सेविका लढवय्या, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यात तुमची भूमिका महत्त्वाची : मुख्यमंत्री

(cm uddhav thackeray will meet pm narendra modi tomorrow)