लोकलमध्ये केवळ ‘या’ प्रवाशांनाच परवानगी?; मुंबईत मॉल, मंदिरही बंद होणार?; महापौरांचं मोठं विधान

| Updated on: Apr 02, 2021 | 11:25 AM

मुंबईत कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईत पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. (Mayor Kishori Pednekar hints at stricter restrictions in mumbai)

लोकलमध्ये केवळ या प्रवाशांनाच परवानगी?; मुंबईत मॉल, मंदिरही बंद होणार?; महापौरांचं मोठं विधान
किशोरी पेडणेकर, महापौर, मुंबई
Follow us on

मुंबई: मुंबईत कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईत पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत ज्या पद्धतीने निर्बंध लावण्यात आले होते, तसेच निर्बंध आताही लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. (Mayor Kishori Pednekar hints at stricter restrictions in mumbai)

महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केलं आहे. मुंबईत कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे मुंबईत मॉल, मंदिर आणि गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावले जाऊ शकतात. तसेच दुकाने आणि बाजरपेठा एक दिवस आड सुरू करण्यात येईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्याशिवाय मुंबईतील लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईत गेल्यावर्षीच्या मार्चसारखीच परिस्थिती निर्माण होणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे.

रोज 7-8 हजार रुग्णांची भर

मुंबईत सक्रिय रुग्णांमध्ये एका महिन्यात 45 हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागासमोर आव्हान निर्माण झालं आहे. मार्च 2020मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून कोरोना विरोधातील लढा सुरू आहे. पालिका आणि राज्य सरकारच्या विविध उपाययोजनांमुळे डिसेंबर अखेरीस कोरोना आटोक्यात येत असल्याचे चित्रं होतं. मात्र फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोरोनाने कहर केला असून रुग्णांची रोजची संख्या सात ते आठ हजारावर पोहोचली आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.

एका महिन्यात रुग्णसंख्या वाढली

1 मार्च रोजी मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या 9,690 होती. 1 एप्रिलपर्यंत म्हणजे अवघ्या महिन्याभरात ही संख्या तब्बल 55 हजार पाच एवढी झाली आहे. त्यामुळे चिंता वाढली असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे, असंही त्या म्हणाल्या.

24 तासात 8 हजार रुग्ण

मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 8 हजार 646 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 हजार 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात मुंबईत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 14 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 12 पुरुष तर 6 महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या 55 हजार 5 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्क्यांवर पोहोचलाय. तर चिंताजनक बाब म्हणजे रुग्ण दुपटीचा कालावधी 49 दिवसांवर आला आहे. 25 मार्च ते 31 मार्च दरम्यानचा कोरोना वाढीचा दर पाहिला तर तो 1.38 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सक्रिय रुग्णांची सद्यस्थिती

1 मार्च – 9,690
15 मार्च – 14,582
25 मार्च – 33,961
1 एप्रिल – 55,005  (Mayor Kishori Pednekar hints at stricter restrictions in mumbai)

 

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रात एकाच दिवसात तब्बल तीन लाखांहून अधिक जणांना लस, मुंबई, पुण्यात किती जणांचे लसीकरण?

येत्या काही दिवसांत मुंबईत कडक निर्बंध लागणार, महापौरांचे मोठे संकेत

 शरद पवारांचा उपचारांना चांगला प्रतिसाद, चालण्याचीही परवानगी

(Mayor Kishori Pednekar hints at stricter restrictions in mumbai)