AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

पायाभूत सुविधांची देखभाल आणि रेल्वेच्या सुरक्षित संचालनासाठी हे रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉक्स आवश्यक असून प्रवाशांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे मध्य रेल्वेच्या प्रशासनाने म्हटले आहे.

सावधान, मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक
sunday mega block
| Updated on: Aug 07, 2026 | 8:38 PM
Share

मध्य रेल्वेने रविवार दि.९ ऑगस्ट २०२६ रोजी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मुख्य मार्गावर माटुंगा- मुलुंड स्थानकाच्या दरम्यान आणि हार्बर मार्गिकेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सीएसएमटी, मुंबई आणि चुनाभट्टी-वांद्रे स्थानकादरम्यान मेगाब्लॉकचे आयोजन केले आहे. यामुळे रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना लोकलचा प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागू शकतो.

मुख्य मार्गिका

माटुंगा–मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 वा.ते दु. 03.55 वाजेपर्यंत

डाऊन धिम्या मार्गावर सीएसएमटी, मुंबईतून सकाळी 10.14 वा. ते दु. 03.32 दरम्यान धावणाऱ्या लोकल फेऱ्यांना माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाऊन फास्ट मार्गिकेवर वळवण्यात येईल. या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप तसेच मुलुंड स्थानकांवर थांबतील. त्यानंतर मुलुंडहून पुन्हा या लोकल डाऊन धिम्या मार्गावर चालवल्या जातील आणि आपल्या गंतव्य स्थानकावर 15 मिनिटांच्या उशीराने पोहचतील.

अप स्लो मार्गावर ठाण्याहून सकाळी 11.07 वा. ते दु. 03.51 वाजेपर्यंत धावणाऱ्या लोकल फेऱ्या मुलुंडहून अप फास्ट लाईनवर वळवल्या जातील. या ट्रेन मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकांवर थांबतील. त्यानंतर माटुंगावरुन पुन्हा अप धिम्या मार्गावर या लोकल चालवल्या जातील आणि आपल्या गंतव्य स्थानकावर सुमारे 15 मिनिटांच्या उशीराने पोहचतील.

स. 11.00 वाजता ते दुपारी 5.00 दरम्यान सीएसएमटीहून प्रस्थान करणाऱ्या तसेच सीएसएमटीला पोहचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल आपल्या निर्धारित वेळेच्या सुमारे 15 मिनिटे उशीराने गंतव्य स्थानकावर पोहचतील.

हार्बर लाईन

सीएसएमटी–चुनाभट्टी – वांद्रे डाऊन हार्बर लाईन 11.40 वा. ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत तसेच चुनाभट्टी-वांद्रे–सीएसएमटी अप हार्बर लाईनवर सकाळी 11.10 वा. ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत

सीएसएमटी, मुंबई ते वाशी-बेलापुर-पनवेलसाठी सकाळी 11.16 वा. ते सायंकाळी 4.47 वाजताच्या दरम्यान धावणाऱ्या डाऊन हार्बर लोकल तसेच वांद्रे-गोरेगावसाठी सकाळी 10.48 वा. ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत चालणाऱ्या डाऊन हार्बर लोकल फेऱ्या रद्द होतील.

पनवेल-बेलापुर-वाशी ते सीएसएमटीसाठी सकाळी 09.53 वा. ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत तसेच गोरेगाव – वांद्रे ते सीएसएमटीसाठी सकाळी 10.45 वा. ते सायंकाळी 5.13 वाजेपर्यंत चालणाऱ्या अप हार्बर फेऱ्या रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे द्वारा वांद्रे आणि गोरेगाव स्थानकांच्या दरम्यान स. 10.30 वा. ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत शॅडो ब्लॉक देखील परिचालित केला जाणार आहे.

ब्लॉकच्या काळात पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) च्या दरम्यान दर 20 मिनिटांनी विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील.

ब्लॉक कालावधीत, सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत, हार्बर लाईनच्या प्रवाशांना मेन लाईन आणि वेस्टर्न रेल्वेमार्गे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...