AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mhada Lottery Result 2023 | सर्वात मोठी बातमी, म्हाडाच्या 4082 घरांची लॉटरी ‘या’ दिवशी जाहीर होणार

मुंबईत स्वत:चं घर घेऊ इच्छित नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने म्हाडाच्या 4082 घरांच्या लॉटरीची तारीख अखेर निश्चित केली आहे. मंत्री अतुल सावे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Mhada Lottery Result 2023 | सर्वात मोठी बातमी, म्हाडाच्या 4082 घरांची लॉटरी 'या' दिवशी जाहीर होणार
Image Credit source: tv9
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 10, 2023 | 10:37 AM
Share

नंदकिशोर गावंडे, Tv9 मराठी, मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : मुंबईत स्वत:चं घर घेऊ इच्छित नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. म्हाडाने काही दिवसांपूर्वी 4082 घरांसाठी सोडत काढली होती. म्हाडाने याबाबतची घोषणा केल्यानंतर लाखो मुंबईकरांनी आपलं नशिब आजमावलं होतं. या 4082 घरांसाठी तब्बल 1 लाख 20 हजार जणांनी अर्ज दाखल केले होते. खरंतर अर्जदार त्यापेक्षा जास्त होते. पण काही अर्ज नियमानुसार, त्रुटींमुळे अपात्र ठरले होते. म्हाडाने अर्जदारांची अंतिम तारीख काही दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केली होती. त्यानंतर आता या सर्व अर्जदारांसाठी अतिशय गुड न्यूज आहे. कारण या सर्व 4082 घरांच्या लॉटरीची तारीख अखेर ठरली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महामंडळाच्या लॉटरीची तारीख ठरली आहे. 14 ऑगस्टला सकाळी 11.30 वाजता मुंबई महामंडळाची लॉटरी निघणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर तारीख निश्चित झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे आणि म्हाडा अधिकारांची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. 4082 घरासाठी जवळपास 1 लाख 20 हजार जणांनी अर्ज दाखल केले होते. या सर्वांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

मुंबईतील कोणकोणत्या भागात आहेत लॉटरीचे घरे?

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेल्या 4082 घरामंध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतील 1947 घरांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे ही पहाडी गोरेगाव येथे असणार आहेत. या घरांसाठी तब्बल 22 हजार 472 नागरिकांनी अर्ज दाखल केलाय.

उत्पन्न गटनिहाय अत्यल्प उत्पन्न गटात 843 घरे आहेत. या घरांसाठी 28 हजार 862 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे या गटातील सर्वाधिक अर्ज हे कन्नमवार नगर विक्रोळीसाठी प्राप्त झाले आहेत. इथे 415 घरे आहेत.

अल्प अत्पन्न गटासाठी 1034 घरे आहेत. या घरांसाठी 60 हजार 522 नागरिकांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे या गटासाठी पहाडी गोरेगाव या भागासाठी सर्वाधिक अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत पहाडी गोरेगाव येथे 416 घरे आहेत.

दरम्यान, मध्यम उत्पन्न गटातील 138 घरांसाठी 8395 जणांनी अर्ज केले आहेत. हे सर्व अर्ज उन्नत नगर गोरेगाव येथील गृहनिर्माण योजनेसाठी करण्यात आले आहेत. तर उच्च उत्पन्न गटातील 120 घरांसाठी 2068 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. हे सर्व अर्ज शिंपोळी कांदिवली पश्चिम येथील गृहनिर्माण योजनेकरता असल्याची माहिती आहे.

Follow Us
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?