AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शरद पवारांबद्दल मनात प्रचंड असंतोष, पण…’, मंत्री अनिल पाटील यांचं खळबळजनक विधान

राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांसमोर आज सुनावणी पार पडत असताना मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या जबाबात मोठं वक्तव्य केलं आहे. अनिल पाटील राष्ट्रवादी पक्षात आले तेव्हापासून त्यांच्या मनात शरद पावर यांच्याविरोधात असंतोष होता, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.

'शरद पवारांबद्दल मनात प्रचंड असंतोष, पण...', मंत्री अनिल पाटील यांचं खळबळजनक विधान
शरद पवार आणि अनिल पाटील यांचा फोटो
| Updated on: Jan 29, 2024 | 5:13 PM
Share

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 29 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पार पडत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे मंत्री अनिल पाटील यांची आज फेरसाक्ष नोंदवण्यात आली. यावेळी अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीत फूट पडण्याआधी दोन गटात कशी धुसफूस होती, याबाबत कल्पना देणारं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आपल्या मनात असंतोष होता, असं मोठं वक्तव्य अनिल पाटील यांनी फेरसाक्ष नोंदवताना केलं आहे. शरद पवार गटाच्या वकिलांनी अनिल पाटील यांना पक्षात प्रवेश केला तेव्हा मनात असंतोष होता का? असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी होय असं उत्तर दिलं. यावेळी त्यांना पुन्हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. “आपल्या मनात शरद पवार यांच्या विरोधात असंतोष होता तर मग पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडू नये किंवा राजीनामा देऊ नये असं मत का होतं?”, असा प्रश्न वकिलांनी केला. “पार्टी एकसंघ राहीली पाहिजे यासाठी राज्यातील नेत्यांच्यासोबत आम्ही सातत्याने चर्चा करायचो. असंतोष कमी होण्याच्या दृष्टीने, लोकांमध्ये पक्षाची इमेज खराब नको व्हायला म्हणून स्टेटमेंट दिले होते”, असं स्पष्टीकरण अनिल पाटील यांनी दिलं.

सुनावणीत नेमके सवाल-जवाब काय?

वकील – प्रतिज्ञापत्रावर सही कोणाची आहे?

पाटील – माझी आहे

वकील – आपण आपल्या वकिलांना स्वतः प्रतिज्ञापत्र करायला सांगितलं होतं का?

पाटील – होय

वकील – सुनील तटकरे यांनी जे शपथपत्र दिलं आहे, यात आपला काही सबंध होता का?

पाटील – नाही

वकील – तटकरे यांनी दाखल केलेलं शपथपत्र आणि तुमचं शपथपत्र यातील काही भाग सारखा आहे

पाटील – तटकरेंच्या शपथपत्राबाबत मला माहीत नाही. फक्त माझं शपथपत्र माहीत आहे

वकील – सोशल मीडियावरील आपल आकाउंट आहे का?

पाटील – होय

वकील – आपल्या अकाऊंटवरून काही पोस्ट केल्या होत्या त्या तुमच्या आहेत का?

पाटील – जेव्हा पक्षाचा कोणताही कार्यक्रम व्हायचे तेव्हा माझा सोशल मीडिया सांभाळणारा व्यक्ती पोस्ट करायचा. याची प्रत्येक वेळा मला माहिती असायचीच असं नाही

वकील – व्यक्तीचं नाव काय?

पाटील – गणेश पाटील आणि त्याची टीम

वकील – ही व्यक्ती तुम्ही वैयक्तिक नेमली होती का?

पाटील – होय

वकिल- २ मे २०२३ ला शरद पवार राजीनामा देणार या संदर्भात विरोध करायला आपण पत्र लिहीले होते का?

अनिल पाटील- मला आठवत नाही

वकिल – तुम्हाला जे पत्र दाखवलं आहे ते बरोबर आहे का?

अनिल पाटील- मला आठवत नाही

वकील- जे सोशल मीडियावर पत्र व्हायरल झालं ते तुमच्या सहमतीने झाल आहे का?

अनिल पाटील- मला आठवत नाही

वकिल- पोस्ट केलेल पत्र आज बघून तुम्हाला आठवतंय का?

अनिल पाटील- मला आठवत नाही

वकिल- आपण दिलेल्या शपथपत्रात २ मे २०२३ च्या आधीच्या बाबींचा उल्लेख केला आहे. मग २ मे संदर्भात कसं आठवत नाही. याला काही विशेष कारण आहे का?

अनिल पाटील- आठवत नाही याला कारणं कस असेल

वकील – 17 जून 2023 ची फेसबुक पोस्ट आठवते का?

पाटील – अमळनेरला शरद पवार माझ्या घरी आले होते. वर्तमानपत्रात काय छापलं मला सांगता येणार नाही

वकील – 2019 ला तुम्ही अमळनेरमधून निवडून आला आहात?

पाटील – होय

वकील – शरद पवार तुमच्या घरी कधी आले होते सांगू शकता का?

पाटील – एका कार्यक्रमाला आले होते तेव्हा घरी आले होते. केव्हा आले ते सांगू शकत नाही

वकील- शरद पवार अमळनेरला आपल्या घरी कधी आले होते काही आठवतं का?

अनिल पाटील – वाचनालयाच्या कार्यक्रमाला ते आले होते. यशवंतराव प्रतिष्ठानच्या ग्रंथालय कार्यक्रमाला ते आले होते

वकील – व्हिडीओ क्लिप बघितल्यावर आपण कन्फर्म करू शकता का की यात जो कंटेन्ट आहे तो पवारांनी राजीनामा देण्याबाबत आपण म्हटलं आहे?

अनिल पाटील – शरद पवारांनी 2 मे रोजी राजीनामा दिला आणि एक कमिटी नेमली. लिखित स्वरूपात राजीनामा दिला होता का माहीत नाही?

वकील – 21 जूनला झालेल्या कार्यक्रमात षण्मुखानंद हॉल ध्ये होता का?

पाटील – होय

वकील – सुनील तटकरेंनी केलेलं भाषण आठवतं का?

पाटील – आठवत नाही

वकील – 16 जुलैला आपण प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्यासोबत शरद पवारांना भेटायला गेला होतात

पाटील – काही चर्चा झाली पवार साहेबांकडून निरोप आला होता

वकील – आपल्याला जो व्हिडीओ दाखवण्यात येत आहे यात प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे ते 16 तारखेला शरद पवारांसोबत बैठक झाली. तेच इकडे सांगितलं आहे का?

पाटील – बरोबर आहे

वकील – व्हिडिओत प्रफुल्ल पटेल यांनी पवारांना नेते असं म्हटलं आहे

पाटील – ते वैयक्तिक बोलले असतील

वकील – तुम्ही राष्ट्रवादीत सामील झालात तेव्हा शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष होते का?

पाटील – होय

वकील – राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची माहिती घेतली होती का?

पाटील – थोड्या प्रमाणात

वकील – ही माहिती कोणाकडून घेतलीत की घटना वाचून?

पाटील – नेत्याकडून घेतली

वकील – आपल्याला ही माहिती मिळाली का कि शरद पवार हेच 1999 पासून अध्यक्ष आहेत

पाटील – होय

वकिल- शरद पवार यांची २०१८ च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत निवड झाली होती का?

अनिल पाटील- शरद पवार यांची फक्त घोषणा झाली. मात्र निवडणूक झाली नाही

वकिल- सप्टेंबर २०२३ मध्ये दिल्लीत युवक राष्ट्रीय संमेलन झाले त्यात तुम्ही होते का?

अनिल पाटील- हो

वकील – या पत्रात असे लिहिले आहे की राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी या सगळे प्रवक्ता, कार्यकारणीतील सदस्य निमंत्रित, कायम सदस्य, पर्यावेक्षक राज्य आणि केंद्रीय स्तरीवरचचे लोक राष्ट्रीय कार्यकारीणी यातून अध्यक्षांची नेमणूक होते का?

अनिल पाटील- मला फारसे आठवत नाही.

वकिल- प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष घोषित करण्यात आले होत का?

अनिल पाटील- नाही. मला आठवत नाही.

वकील- मग मला विचारावे लागले की ते उपस्थित असताना त्यांनी काय पाहीले?

विधानसभा अध्यक्ष – मी इतके दिवस ही सगळी सुनावणी पाहत आहे. मला असे जाणवते की सगळ्याच राजकीय पक्ष हे त्यांच्या घटनेतील अपेक्षेप्रमाणे चालवले जात नाही. मला अपेक्षा आहे की यापुढे सगळे पक्ष या गोष्टी अधिक गांभिर्याने घेतील.

वकील राष्ट्रीय अध्यक्षची निवड करत असताना नॉमिनेश हे रिटर्निंग ऑफिसर सर्व राज्यातून देशभरातून मागवत असतात का?

पाटील : हे असं काहीच झालं नाही.

वकील : असं घडलं नाही पण अशी प्रक्रिया आहे का?

पाटील : खालून वर पर्यंत जे निवडून आले त्यांना बोलावलं जातं

वकील : महाराष्ट्रातून शरद पवार यांचं नोमिनेशन दाखल केलं होतं. यावर प्रफुल्ल पटेल, अजित पवार आणि छगन भुजबळ यांची सही होती?

अनिल पाटील- या संदर्भात मला आठवत नाही

वकिल- १७ जूनच्या आधी सोशल मीडियावर शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उल्लेख झाला आहे हे बरोबर आहे का?

अनिल पाटील- जूनच्या आधी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते

वकिल- तुमच्या शपथपत्रात म्हटले आहे की शरद पवार विचार विनिमय न करता पक्ष चालवत होते.

अनिल पाटील- मला सातत्याने वाटत होते की पक्षात नियुक्त्या केल्या जातात. निवडणुका होत नाही.

वकील – तुम्ही पक्षात आल्यावर मनात अंसतोष होता का?

पाटील – होय

वकील – आपल्या मनात शरद पवार यांच्या विरोधात असंतोष होता तर मग पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडू नये किंवा राजीनामा देऊ नये असं मत का होतं?

पाटील – पक्ष एकसंघ असला पाहिजे, एकच निर्णय असायला हवा, याबाबत आम्ही राज्यातील नेते, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करायचो. असंतोष कमी व्हावा म्हणून एकसंघ राहण्यासाठी, एकत्र राहण्यासाठी नागरिकांमध्ये पक्षाची प्रतिमा स्वच्छ रहावी या अनुषंगाने मी मत व्यक्त केलं.

वकील- जर आपल्या मनात असंतोष होता तर २ आणि ३ मे २०२३ मध्ये शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये यासाठी वारंवार विनंती का करत होता?

अनिल पाटील- पार्टी एकसंघ राहीली पाहिजे यासाठी राज्यातील नेत्यांच्यासोबत आम्ही सातत्याने चर्चा करायचो. असंतोष कमी होण्याच्या दृष्टीने, लोकांमध्ये पक्षाची इमेज खराब नको व्हायला म्हणून स्टेटमेंट दिले होते.

वकील – शरद पवार यांच्याबद्दल असंतोष वाटत होता तर त्यांनी थांबावं यासाठी तुम्ही सोशल मीडियावर अध्यक्ष राहावे असं का लिहिलं?

पाटील : मी उत्तर दिलं आहे

वकील – राष्ट्रीवादीच्या विधिमंडळाचा चीफ व्हीप म्हणून तुमची नेमणूक कधी केली गेली?

पाटील : 2019 ला जेव्हा सरकार आलं तेव्हा मला मुख्य प्रतोद म्हणून निवडलं

वकील – तुम्ही याची प्रक्रिया सांगू शकाल का?

पाटील : माझ्या माहितीनुसार पक्षाच्या नेत्यांशी चर्चा झाली आणि स्पीकरला त्याची माहिती दिली गेली.

वकील – आपण ज्या प्रक्रियेचा उल्लेख प्रश्न ५८ च्या उत्तरात सांगितलं त्यानुसार आपली प्रतोद म्हणून निवड झाली का ?

पाटील – माझ्या माहितीनुसार चीफ व्हिपची प्रक्रिया अशीच असते

वकील- जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून त्यांच्या पदावर कधी हरकत घेतली होती का?

अनिल पाटील – नाही

वकील – प्रदेशाध्यक्ष पदाच्या संदर्भात तुम्ही कधी तक्रार केली होती का?

अनिल पाटील- लेखी तक्रार केली नव्हती. मात्र तोंडी तक्रार केली होती. कारण अध्यक्ष पदाची निवडणूक झाली पाहिजे.

वकील – आपली नियुक्ती झाली हे कोणी कळवलं?

अनिल पाटील -: जयंत पाटील यांनी

वकील – या काळात ते राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाचे नेते होते का?

अनिल पाटील -: जयंत पाटील नेमले गेले होते

वकील – तुमच्या उत्तरात याचा उल्लेख आहे का जेव्हा तुम्ही प्रतोद म्हणून निवडणूक झाली होती का त्याची प्रक्रिया काय?

अनिल पाटील – माझ्या माते प्रतोद निवडण्याची प्रक्रिया अशीच असते

वकील – जर तुम्हाला शरद पवारांची लीडरशिप मान्य नव्हती, जेव्हा पासून तुम्ही राष्ट्रवादीत आला तर मग तुम्ही प्रतोद म्हणून पदाचा स्वीकार कसा केला?

अनिल पाटील – असंतोष असला म्हणून काम करायचं नाही असा कुठेही उल्लेख नाही, म्हणून मी काम करत राहिलो

वकील – जेव्हा तुम्ही 2019 च्या निवडूणूक प्रक्रियेत सहभागी झालात, तेव्हा जयंत पाटील यांनी तुमच्या फॉर्म बीवर साही केली होती का?

अनिल पाटील : होय हे बरोबर आहे

वकील – तुम्ही ते करत असलेल्या प्रक्रियेला कधी प्रश्न उपस्थित केला का आणि ते नेते म्हणून कार्यरत आहेत यावर हरकत घेतली का?

उत्तर: नाही

वकील – जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असताना तुम्ही प्रश्न उपस्थित केलेत का?

पाटील : लेखी कधी केला नाही पण तोंडी बोलायचो की प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक का झाली नाही?

वकील – त्यांना हक्क होता का तुमच्या फॉर्म बी वर साही करण्याचा?

अनिल पाटील यांच्या वकिलांकडून हरकत घेण्यात आली. फॉर्म बी हा इश्यू असू शकत नाही, असं अजित पवार गटाचे वकील म्हणाले.

शरद पवार वकील – फॉर्म बी महत्वाचा आहे. कारण विटनेस आता पक्षाच्या प्रक्रियेवार प्रश्न उपस्थित करत आहेत. पण त्यांनी हीच प्रक्रिया स्वीकारली जेव्हा त्यांना ते वाटलं. फॉर्म बी दरम्यान. माझा प्रश्न योग्य आहे.

उत्तर: याच्या विषयी माला माहिती नाही

वकील – हा निर्णय झाला तो शरद पवार गटातील लोकांना स्वत: तुम्ही कळवला होता का?

अनिल पाटील- काहींना मी स्वत: कळवलं होतं. लेखी निर्णय कळवला नव्हता तर तोंडी कळवला होता. जयंत पाटील यांच्यासोबत मी फोनवरून बोललो होतो

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.