चेहऱ्यावर ताण-तणाव… पण धनंजय मुंडेंचा ‘द शो मस्ट गो ऑन’

बलात्कार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने अभय दिल्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Minister Dhananjay Munde spent two hours in janta darbar)

चेहऱ्यावर ताण-तणाव... पण धनंजय मुंडेंचा 'द शो मस्ट गो ऑन'

मुंबई: बलात्कार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने अभय दिल्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी कामालाही सुरुवात केली आहे. आजही त्यांनी जनता दरबार घेतला. अनेकांची निवेदने स्वीकारून त्यांचे प्रश्नही मार्गी लावले. पण मुंडे अजूनही तणावात असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. त्यांच्या चेहऱ्यावरील ताणतणावावरून ते टेन्शनमध्ये असल्याचं दिसून येत आहे. (Minister Dhananjay Munde spent two hours in janta darbar)

बलात्कार प्रकरणाचे आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे यांच्या पाठिशी खंबीर उभी राहिली. त्यामुळे मुंडे यांना दिलासा मिळाला. त्यानंतर त्यांनी कामालाही सुरुवात केली. गेल्या गुरुवारी राष्ट्रवादी कार्यालयात त्यांनी जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या तक्रारी दूर केल्या. त्या दिवशीही त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्ट दिसत होता. आजही मुंडे यांनी जनता दरबार घेतला. यावेळी त्यांनी अनेक लोकांची निवेदने स्वीकारली. त्यावर सह्याही केल्या. तसेच काही लोकांचे प्रश्नही समजून घेतले. सुमारे दोन तास त्यांचा जनता दरबार सुरू होता.

फोटो काढले पण,…

मात्र, या दोन तासात त्यांनी फक्त नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. या दोन तासात त्यांनी नागरिकांशी क्वचितच संवाद साधला. अधूनमधून त्यांनी नागरिकांच्या निवेदनाची दखल घेण्याच्या सूचना पीएला केल्या. मुंडे दोन तास कार्यालयात होते. पण अपवाद सोडल्यास पूर्णवेळ ते मान खाली घालून निवेदनावर सह्या करताना दिसले. काही नागरिकांनी त्यांना आपल्या तक्रारी सांगायला सुरुवात केली. तेव्हाही नागरिकांच्या नजरेला नजर भिडवण्याऐवजी खाली मान घालूनच ते निवेदन वाचत असल्याचं दाखवत तक्रारी ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तणाव होता. त्यामुळे जनता दरबारमधील वातावरणही गंभीर बनलं होतं. नाही म्हणायला काही लोकांसोबत त्यांनी फोटो काढले. पण फोटोतही त्यांच्या चेहऱ्यावरील गांभीर्य पूर्णपणे दिसून येतं.

मास्क आणि….

जनता दरबार सुरू असताना सुरुवातीला मुंडे यांनी तोंडाला मास्क लावला होता. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील भाव दिसून येत नव्हते. नंतर त्यांनी तोंडावरील मास्क काढला. तेव्हा मुंडे अजूनही तणावात असल्याचं स्पष्ट दिसून येत होतं.

काय आहे प्रकरण

रेणू शर्मा असे या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव आहे. रेणू शर्मा ही एक बॉलिवूड गायिका आहे. रेणू अशोक शर्मा असे तिचे संपूर्ण नाव आहे. “रेणू शर्मा यांच्या दाव्यानुसार, रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे यांची ओळख 1997 मध्ये झाली. रेणू शर्मा आणि धनंजय मुंडे हे मध्य प्रदेशातील इंदुरमध्ये बहीण करुणा शर्मा यांच्या घरी भेटले.

त्यावेळी रेणू शर्मा यांचे वय 16-17 इतके होते. धनंजय मुंडे आणि करुणा या दोघांचा 1998 मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर 2006 मध्ये करुणा या प्रसूतीसाठी इंदुरमध्ये गेली होती. त्यावेळी रेणू घरात एकटी आहे, हे धनंजय मुंडेंना माहिती होतं. त्यावेळी धनंजय मुंडे काहीही न सांगता रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्या इच्छेविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धनंजय मुंडे दर दोन-तीन दिवसांनी माझ्या घरी यायचे आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. याबाबतचा एक व्हिडीओही काढला होता. यानंतर धनंजय मुंडे यांनी मला वारंवार फोन करत प्रेम करत असल्याची कबुली दिली. तसेच मला सांगितले की, जर तुला गायिका बनायचे असेल, तर मी तुला बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक निर्मांत्याशी भेटवेन. तुला बॉलिवूडमध्ये लाँच करेन. या नावाखाली धनंजय मुंडेंनी इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवला. तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले.” (Minister Dhananjay Munde spent two hours in janta darbar)

 

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?

(Minister Dhananjay Munde spent two hours in janta darbar)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI