AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aslam Shaikh | उद्धवजींनी महाराष्ट्राला सांभाळलं, भाजपच्या पोटात दुखतंय : अस्लम शेख

भाजपच्या पोटात दुखत आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत. प्रत्येक दिवशी एक नेत्याला समोर करुन बदनामीचं काम केलं जात आहे, असं अस्लम शेख म्हणाले

Aslam Shaikh | उद्धवजींनी महाराष्ट्राला सांभाळलं, भाजपच्या पोटात दुखतंय : अस्लम शेख
| Updated on: Jul 01, 2020 | 9:16 PM
Share

मुंबई : “देशातील सध्याची परिस्थिती पाहिली असता, ज्या (MLA Aslam Shaikh Criticize BJP) पद्धतीने उद्धवजींनी महाराष्ट्राला सांभाळलं आहे. केंद्राने त्यांचे कौतुक केलं आहे. राज्य सरकारने कोरोना असताना देखील मुंबईमध्ये चांगलं काम केलेलं आहे. भाजपला हे समजत नाही”, अशी टीका मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी (MLA Aslam Shaikh Criticize BJP) केली आहे.

“भाजपच्या पोटात दुखत आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी असे वक्तव्य करत आहेत. प्रत्येक दिवशी एक नेत्याला समोर करुन बदनामीचं काम केलं जात आहे. उद्धव ठाकरे एक नंबर काम करत आहेत”, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार फोल ठरतेय, असं म्हणत भाजपकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे (MLA Aslam Shaikh Criticize BJP).

शरद पवारांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाही : अस्लम शेख

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार वादावरही अस्लम शेख यांनी मत मांडलं आहे. राहुल गांधी आणि शरद पवार यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे, असं मत अस्लम शेख यांनी व्यक्त केलं.

“राहुल गांधी यांनी आपलं मत मांडलं आणि शरद पवार यांनी त्यांचं मत मांडलं आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे शरद पवारांनी राहुल गांधींबद्दल काय विधान केलं, त्याला इतकं महत्त्व नाही”, असं ते म्हणाले.

“शरद पवार यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. कोणी कितीही म्हटलं, तरी हे सरकार पाच वर्ष टिकणार आहे”, असा विश्वास अस्लम शेख यांनी व्यक्त केला (MLA Aslam Shaikh Criticize BJP).

संबंधित बातम्या :

संकट टळलं, यंत्रणा सज्ज होती, आता देवाकडे प्रार्थना, हे वादळ देशाबाहेर जावं : अस्लम शेख

Nisarga Cyclone : मुंबई शहराचे पालकमंत्री मध्यरात्रीही अॅक्शन मोडमध्ये, मढ-भाटीत मच्छिमारांची भेट

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.