हातपाय तोडून हातात देईल, पंतप्रधानांकडे कंप्लेट कर, पगार देत नाही जा; ठाकरेंच्या आमदाराने शिक्षकाला धमकावले

ठाकरे गटाचे आमदार तुकाराम काते यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये तुकाराम काते एका शिक्षकाला धमकी देताना दिसत आहेत.

हातपाय तोडून हातात देईल, पंतप्रधानांकडे कंप्लेट कर, पगार देत नाही जा; ठाकरेंच्या आमदाराने शिक्षकाला धमकावले
tukaram kateImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 9:14 AM

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आमदार तुकाराम काते यांची एका शिक्षकाबरोबरची कथित ऑडिओ क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पगार मागणाऱ्या शिक्षकाला आमदार तुकाराम काते शिवीगाळ करताना आणि धमकावताना दिसत आहे. तुला पगार देणार नाही. पंतप्रधानांकडे जाऊन माझी तक्रार कर. तुला काय करायचं ते कर. पण पगार मिळणार नाही, असं सांगतानाच जास्त हुशारी केली तर हातपाय तोडून हातात देईल, अशी धमकीही तुकाराम काते यांनी या शिक्षकाला दिली आहे. ही क्लिप सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपची टीव्ही9 मराठी कोणतीही पृष्टी करत नाही.

ही कथित ऑडिओ क्लिप 1 मिनिटे 37 सेकंदाची आहे. यात शिक्षक विनोद पोकळे आणि आमदार तुकाराम काते यांचा संवाद दिसतोय. शिक्षक विनोद पोकळे हे तुकाराम काते यांच्या शाळेत नोकरीला होते. इंग्रजी माध्यमात शिकवत होते. इयत्ता 8 ते 10 वीच्या वर्गाला शिकवत होते. त्यांना सहा महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाही. शाळेतील शिक्षक नागेश यांनी पगार देणार नाही, तुला काय करायचं ते कर, असं पोकळे यांना म्हटल्याचं या संभाषणातून दिसतं. पोकळे यांनी अनेक ठिकाणी पगार न मिळाल्याचा गाजावाजा केल्याने काते संतापलेले दिसत आहेत. या संतापाच्या भरातच त्यांनी पोकळे यांना शिवीगाळ केल्याचंही दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

तुकाराम काते आणि शिक्षकांचे संभाषण जशास तसे

शिक्षक : हाँ सर, नमस्कार. विनोद पोकळे बोलतो सर. आपल्या शाळेत कामाला होतो. पगार आला नाही सर 23 महिन्याचा.

तुकाराम काते : कोण?

शिक्षक : विनोद पोकळे बोलतो सर. आपल्या शाळेत कामाला होतो. इंग्लिश मीडियमला. 8 वी, 9 वी. 10वीला शिकवायला.

तुकाराम काते : हां हां…

शिक्षक : पगार राहिला आहे सर 23 महिन्याचा…

काते : तू आता काय कर माहित्ये…

शिक्षक : हां सर

काते : पंतप्रधानांकडे कंप्लेट कर माझी. पगार देत नाही अशी पंतप्रधानांकडे कंप्लेट कर. बारा गावात फिरून येतो, सर्वांना सांगतो माझा पगार दिला नाही… पगार दिला नाही… मी तुला शाळेत असताना ये बोललो होतो, तेव्हा आलाच नाही.

शिक्षक : मी आलतो सर…सर सर सॉरी… तुम्ही…

काते : अरे कधी आला होता? कधी आला होतास रे गाढवा…?

शिक्षक : सर… मी शाळेत आलतो सर… नागेश सरांनी ….

काते : साला हातपाय तोडून हातात देईन तुझ्या जास्त हुशारी केली तर…

शिक्षक : म्हणजे?

काते : समजला काय? साला नालायकगिरी करतो…

शिक्षक : नालायकगिरी काय केली सर?

काते : इकडे जा तिकडे जा… ही नालायकगिरी … नालायकगिरी इकडे तिकडे कुठे जातो… सर्वांकडे जातो…कशाला जातो?

शिक्षक : अहो, सर सर्वांकडे कुठे गेलो… नागेश सर सरळ बोलतात पगार देणार नाही. काय करायचं करून घ्या…

काते : नागेश सर… नागेश नाय… तू दुसरीकडे गेला तर मला फोन आले तिकडून… समजलं..

शिक्षक : सर पगारासाठी मी सहा महिने राऊंड मारत होतो.

काते : तुला कुठं जायचं जा…आणि मला परत फोन केला तर बरोबर करून टाकेल तुला मी.

शिक्षक : म्हणजे सर?

काते : म्हणजे काय नाय… फोन ठेव साल्या XXX

शिक्षक : अहो सर पगार राहिला. तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात सर असं बोलतात का?

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.