
राज्यात महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपली आहे. आज निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली कंबर कसली आहे. मनसेने अत्यंत सावध पवित्रा घेत ५२ जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मनसेकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३७ उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. मात्र उर्वरित नावांबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. विरोधी पक्षांकडून होणारी फोडाफोडी आणि अंतर्गत बंडाळी टाळण्यासाठी राज ठाकरे सावध भूमिका घेत असल्याचे बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरापर्यंत मनसेच्या ४९ संभाव्य उमेदवारांना निवडणूक अर्जांचे एबी फॉर्म वाटप करण्यात आले आहे. सध्या उद्धव ठाकरेंचे मातोश्रीवर आणि राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनसेने आपल्या अने निष्ठावान कार्यकर्त्यांना मैदानात उतरवण्याची तयारी पूर्ण केली आहे. मात्र ही यादी अद्याप अधिकृतपणे प्रसारमाध्यमांसाठी जाहीर करण्यात आलेली नाही. मनसे या निवडणुकीत एकूण ५२ जागांवर आपले उमेदवार उतरवणार असल्याचे बोललं जात आहे. काल रात्री उशिरापर्यंत ४९ संभाव्य उमेदवारांना निवडणुकीचे अर्ज (AB Forms) देण्यात आले असून, उर्वरित नावांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
मनसेकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गुप्त ठेवण्यात येणार आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे ही यादी जाहीर केल्यास तिकीट न मिळालेले इच्छुक उमेदवार नाराज होऊन बंडखोरी करण्याची किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याची शक्यता आहेत. तसेच शेवटच्या क्षणी नाव समोर आल्यास विरोधी उमेदवारांना रणनीती आखण्यासाठी कमी वेळ मिळेल, अशी मनसेची रणनिती आहे. आज देखील काही उर्वरित जागांसाठी उमेदवारी अर्ज देण्यात येणार आहेत.
| क्रमांक | वॉर्ड क्रमांक (Ward No.) | उमेदवाराचे नाव |
| 1 | 8 | कस्तुरी रोहेकर |
| 2 | 10 | विजय कृष्णा पाटील |
| 3 | 11 | कविता बागुल माने |
| 4 | 18 | सदिच्छा मोरे |
| 5 | 20 | दिनेश साळवी |
| 6 | 21 | सोनाली देव मिश्रा |
| 7 | 27 | आशा विष्णू चांदर |
| 8 | 36 | प्रशांत महाडिक |
| 9 | 38 | सुरेखा परब लोके |
| 10 | 55 | शैलेंद्र मोरे |
| 11 | 58 | वीरेंद्र जाधव |
| 12 | 67 | कुशल सुरेश धुरी |
| 13 | 68 | संदेश देसाई |
| 14 | 81 | शबनम शेख |
| 15 | 84 | रूपाली दळवी |
| 16 | 98 | दिप्ती काते |
| 17 | 102 | अनंत हजारे |
| 18 | 106 | सत्यवान दळवी |
| 19 | 110 | हरीनाक्षी मोहन चिराथ |
| 20 | 115 | ज्योती अनिल राजभोज |
| 21 | 129 | विजया गिते |
| 22 | 133 | भाग्यश्री अविनाश जाधव |
| 23 | 139 | शिरोमणी येशू जगली |
| 24 | 143 | प्रांजल राणे |
| 25 | 150 | सविता माऊली थोरवे |
| 26 | 152 | सुधांशू दुनबळे |
| 27 | 183 | पारूबाई कटके |
| 28 | 192 | यशवंत किल्लेदार |
| 29 | 197 | रचना साळवी |
| 30 | 205 | सुप्रिया दळवी |
| 31 | 207 | शलाका आरयन |
| 32 | 209 | हसीना महिमकर |
| 33 | 214 | मुकेश भालेराव |
| 34 | 216 | राजश्री नागरे |
| 35 | 217 | निलेश शिरधनकर |
| 36 | 223 | प्रशांत गांधी |
| 37 | 226 | बबन महाडिक |
ज्या प्रभागांमध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत, तिथे वरिष्ठांकडून त्यांची मनधरणी केली जात आहे. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ नये आणि सर्वांनी मिळून अधिकृत उमेदवाराचे काम करावे, यासाठी मनसेचे नेते प्रयत्नशील आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील संभाव्य युती किंवा जागावाटपाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मनसेचा हा ५२ जागांचा आकडा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मनसेने आतापर्यंत अनुभवी नेत्यांसह अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
या यादीत मनसेचे खंदे समर्थक यशवंत किल्लेदार (वॉर्ड १९२), बबन महाडिक (वॉर्ड २२६) आणि मुकेश भालेराव (वॉर्ड २१४) यांसारख्या विश्वासू नावांचा समावेश आहे. तसेच कस्तुरी रोहेकर, शैलेंद्र मोरे आणि प्रशांत महाडिक यांनाही राज ठाकरेंनी मैदानात उतरवले आहे.