Raj Thackeray Krishna Kunj | ‘कृष्णकुंज’बाहेर कोरोनाला रोखलं, राज ठाकरेंच्या ताफ्यातील दोन पोलिसांची कोरोनावर मात

राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. (Raj Thackeray security guard corona positive)

Raj Thackeray Krishna Kunj | 'कृष्णकुंज'बाहेर कोरोनाला रोखलं, राज ठाकरेंच्या ताफ्यातील दोन पोलिसांची कोरोनावर मात
Raj Thackeray Krishna Kunj

मुंबई : एकीकडे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानापर्यंत कोरोनाने धडक दिल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.  या दोन पोलिसांनी करोनावर मात केली आहे. हे पोलीस कर्मचारी उपचारानंतर बरे होऊन आता कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांनी ‘कृष्णकुंज’च्या दारातच कोरोनाला रोखल्याचं चित्र आहे.  (Raj Thackerays residence Krishna Kunj security guard tests corona positive)

राज्यात अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. अनेक पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र काही पोलिसांचा कोरोनाशी लढताना दुर्दैवी मृत्यू झाला. एकट्या मुंबई पोलीस दलातील 2028 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 290 पोलीस अधिकारी आणि 1738 पोलिसांचा समावेश आहे. यापैकी 1233 पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत तर अजून 773 पोलिसांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 22 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

राज ठाकरेंच्या ताफ्यातील पोलिसांची कोरोनावर मात

दरम्यान, राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजवरील दोन पोलिसांनीही आता कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मोठा दिलासा म्हणावं लागेल.

राज ठाकरे यांचं आवाहन

राज ठाकरे यांनी 14 जून रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने कुटुंबासोबतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. “मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत” असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे.

“कोरोनाच्या कठीण प्रसंगात महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणात पदरमोड करुन लोकांच्या मदतीला धावून जात आहे. अन्नधान्य वाटपापासून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे, अशा बातम्या ऐकून मला आनंद आणि अभिमान वाटत राहायचा” अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

धनंजय मुंडेंना कोरोना, मंत्री होम क्वारंटाईन 

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या काही मंत्र्यांनीही स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या मंत्र्यांनी ही तातडीची पावले उचलली आहेत.

(Raj Thackerays residence Krishna Kunj security guard tests corona positive)

संबंधित बातम्या 

धनंजय मुंडे यांना कोरोना, ठाकरे सरकारमधील काही मंत्रीही सेल्फ क्वारंटाईन

Raj Thackeray | राज ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांना आवाहन  

Dhananjay Munde | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

Published On - 11:55 am, Fri, 12 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI