AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | राज ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांना आवाहन

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. (Raj Thackeray MNS Birthday)

Raj Thackeray | राज ठाकरे यांचे वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांना आवाहन
| Updated on: Jun 12, 2020 | 8:39 AM
Share

मुंबई : “मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत” असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी 14 जून रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने कुटुंबासोबतच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र ट्विटरवर शेअर केले आहे. (Raj Thackeray appeals MNS volunteers not to celebrate his Birthday)

“कोरोनाच्या कठीण प्रसंगात महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणात पदरमोड करुन लोकांच्या मदतीला धावून जात आहे. अन्नधान्य वाटपापासून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देणे आणि त्यांच्या कुटुंबियांना धीर देणे, अशा बातम्या ऐकून मला आनंद आणि अभिमान वाटत राहायचा” अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा : राऊत साहेब… तर मी स्वत: ‘सामना’त येऊन तुमच्या पाया पडेन : संदीप देशपांडे

“मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले. ही मदत करत असताना अनेकांनी आपले आणि आपल्या कुटुंबाचे प्राण धोक्यात घातले. काही जणांना कोरोनाची लागणही झाली. पण ना ते मागे हटले, ना त्यांचे कुटुंब” असंही राज ठाकरे म्हणतात.

राज ठाकरे यांचे आवाहन काय?

14 तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही, थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे अजिबात उचित नाही. म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझ्या सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. पण हे करताना तुम्ही तुमच्या आणि कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाचं काहीच नाही. सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणार आहेच, तेव्हा तुमच्याशी भेट होईलच

(Raj Thackeray appeals MNS volunteers not to celebrate his Birthday)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.