AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS protest | मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास

मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन करत आज (21 सप्टेंबर) मुंबईकरांसाठी लोकल रेल्वेमधून प्रवास केला. (MNS Protest For Mumbai Local)

MNS protest | मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 21, 2020 | 10:06 AM
Share

मुंबई : मुंबईची लाईफलाईन अर्थातच मुंबई लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेन सविनय कायदेभंग आंदोलन केलं. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande MNS) यांच्यासह मनसे नेत्यांनी  मनसेने सविनय कायदेभंग आंदोलन करत मुंबई लोकल रेल्वेने प्रवास केला. रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे, सरचिटणीस गजानन काळे, अतुल भगत यांच्यासह मनसे नेत्यांनी लोकल ट्रेनने प्रवास केला.

लोकल रेल्वेअभावी मुंबईकरांचे हाल होत आहेत, त्यामुळे तातडीने लोकल रेल्वे सुरु करण्याची मागणी मनसेची आहे. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. (MNS Protest For Mumbai Local)

मनसेचा सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान सरचिटणीस संदीप देशपांडेंनी रेल्वे प्रवास केला असताना तिकडे ठाणे स्टेशनवर अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मनसेच्या सविनय कायदेभंग आंदोलनच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ठिक-ठिकाणच्या रेल्वे स्थानकाबाहेर चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत.

आंदोलनापूर्वी मनसैनिकांना पोलिसांच्या नोटीस 

मनसेच्या सविनय आंदोलनच्या पार्श्वभूमीवर अनेक मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मात्र तरीही मनसे आंदोलनावर ठाम आहे. सर्व सामान्य लोकांना रेल्वेमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आज होणाऱ्या आंदोलनाआधी मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

जर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्राच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी 5 हून अधिक माणसं दिसल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे यात नमूद करण्यात आले आहे. कलम 149 आणि 144 प्रमाणे मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था भंग केल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असेही यात म्हटलं आहे.

नोटिसीनंतरही मनसे आंदोलनावर ठाम

“नोटीस आली तरी आंदोलन हे केलं जाणार, मुंबईत शिवसेनेचा आंदोलनाला परवानगी मिळते. मग मनसेच्या आंदोलनाला नोटीस का? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. आमचं आंदोलन हे सर्वसामान्यांसाठी आहे, गेले अनेक दिवस लोकल सेवा बंद आहे. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. मनसेचे आंदोलन हे होणारच, कंगना विरोधातील आंदोलनाला शिवसेना परवानगी फक्त मनसेच्या आंदोलनाला नोटीस दिली जाते”, असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

लोकल सुरु करण्याची मागणी 

पश्चिम रेल्वेवरील वसई-विरार, नालासोपारा, तर मध्य रेल्वेवरील ठाणे आणि त्यापुढील डोंबिवली, अंबरनाथ, कल्याण, बदलापूर, कसारा, कर्जत अशा भागात राहणाऱ्या नागरिकांची ऑफिस गाठताना मोठी गैरसोय होत आहे. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने कार्यालयात उपस्थिती वाढवली जात आहे, मात्र प्रवासाची साधने नसल्याने बसने येण्या-जाण्यातच दिवसाचा निम्मा वेळ खर्ची पडत असल्याची तक्रार होत आहे.

लोकलमधून प्रवास करण्यास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुभा असल्याने इतरांना बसशिवाय पर्याय नाही. एकीकडे बेस्ट बसची संख्या प्रशासनाने हळूहळू वाढवली आहे, मात्र लोकलचा भार पेलण्याइतकी ही सेवा सक्षम नसल्याने ताण वाढत आहे. कुठे खचाखच गर्दीने भरलेल्या बसने प्रवास करावा लागतो, अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. तर काही वेळा बस थांबवली जात नसल्याने अनेक तास वाट पाहत राहावी लागते. त्यामुळे लोकल लवकर सुरु करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. (MNS Protest For Mumbai Local)

संबंधित बातम्या : 

 रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई, संदीप देशपांडेंना नोटीस, मनसे आंदोलनावर ठाम

मनसेचा सविनय कायदेभंग, बंधन झुगारुन येत्या सोमवारी लोकलने प्रवास करणार

Follow Us
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?