AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: प्रत्येक गोष्टीचा हिशोब….ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचा सर्वात मोठा इशारा, त्या खासदारांची औकातच काढली

Operation Tiger Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde: ऑपरेशन टायगरने गेल्या तीन दिवसात राज्याचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेचे खासदार आता पत्रकार परिषद घेणार आहेत. खासदार संजय राऊत यांच्यासोबत इतर खासदार त्याला उपस्थित असतील. त्याचवेळी राऊतांनी मोठा इशारा दिला आहे.

Sanjay Raut: प्रत्येक गोष्टीचा हिशोब....ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांचा सर्वात मोठा इशारा, त्या खासदारांची औकातच काढली
संजय राऊत, शिवसेना, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 17, 2026 | 10:38 AM
Share

Sanjay Raut on Operation Tiger : उद्धव सेनेत मोठ्या भूकंपाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राजधानी दिल्लीत त्या अनुषंगाने बड्या घडामोडी घडत आहेत. ऑपरेशन टायगरने गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात गोंधळ उडवून दिला आहे. मुंबईत रविवारी मातोश्रीवरील बैठकीत ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व खासदार उपस्थित असल्याचा दावा करण्यात आला. पण काल संध्याकाळी मोठ्या घडामोडी घडल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्लीत पोहचले. तर उद्धव सेनेचे काही खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याचवेळी खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून मोठा इशारा दिला आहे. त्यांनी अजून एक मोठे ट्विट करत खासदार राजाभाऊ वाजे आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याविषयी मोठा दावा केला आहे.

नांदेड विमानतळावरील ती इनसाईड स्टोरी काय?

ऑपरेशन टायगरविषयी खासदार संजय राऊत यांनी मोठे भाष्य केले आहे. त्यांनी नांदेड विमानतळावरील इनसाइट स्टोरीविषयी मोठा दावा केला आहे. नांदेड विमानतळावर एक चार्टड विमान उतरते. ऑपरेशन टायगरच्या नावाखाली दोन खासदारांना उचलून निघून जाते, असा आरोप राऊतांनी केला आहे. यांची रिक्षात फिरण्याची औकात नव्हती. खासगी विमानाने फिरण्या एवढी किंमत ठाकरे नामा मुळे वाढली, असा जोरदार हल्लाबोल राऊतांनी या खासदारांवर केला आहे. तर त्याचवेळी प्रत्येक गोष्टीचा हिशोब केला जाईल असा इशारा देत डरपोक कोल्ह्यांच्या पळवा पळविला ऑपरेशन टायगर का म्हणता? असा सवालही राऊतांनी विचारला आहे.

राजाभाऊ वाजे, आष्टीकरांविषयी मोठे भाष्य

तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये खासदार संजय राऊत यांनी खासदार राजाभाऊ वाजे आणि हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांच्याविषयी मोठे भाष्य केले आहे. “Media ची कमाल आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे दिल्लीत उद्योग समितीच्या बैठकीसाठी निघाले आहेत. इकडे बातम्या वेगळ्याच दाखवत आहेत. हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर यांनी सांगितले की ते हिंगोलीत आहे, पण काही लोक माझी खोटी सही करू शकतात. आता हे जे लोक आहेत, यांना यावेळी जनता आणि शिवसेना सोडणार नाही, हे नक्की.” असे ट्विट राऊतांनी केले आहे.

थोड्याच वेळात दिल्लीत पत्रकार परिषद

खासदार संजय राऊत, अनिल सावंत यांच्यासह उद्धव ठाकरे यांचे काही खासदार लवकरच दिल्लीत पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदेत सर्व घडामोडींवर मोठे भाष्य समोर येईल. तर कोण कोण खासदार फुटले, त्यामागे कुणाचा हात आहे. कुणाला किती पैसा मिळाला, कुणाला मंत्रिपद देण्यात आले, याविषयीचे आरोप करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. पण या सर्व घडामोडींमुळे दिल्लीसह राज्यात वातावरण तापले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी