AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कपिल देवला बॉल कसा घासायचा हे जय शाह यांनी शिकवलं’; राज्यातील बड्या नेत्याच्या वक्तव्याची चर्चा

निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. त्याआधी सर्व नेते जोरदार ताकद लावत प्रचाराला लागत असल्याचं दिसत आहे. भोरमध्ये झालेल्या सभेत राज्यातील एका बड्या नेत्याने थेट केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या मुलावरच निशाणा साधला आहे. नेमकी कोणी टीका केली जाणून घ्या.

'कपिल देवला बॉल कसा घासायचा हे जय शाह यांनी शिकवलं'; राज्यातील बड्या नेत्याच्या वक्तव्याची चर्चा
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 09, 2024 | 10:36 PM
Share

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीआधी राज्यात सत्ताधारी आणि विरोधक सभा घेत फिल्डिंग लावत असल्याचं दिसत आहे. महायुती आणि मविआकडून आता जागावाटपासाठी बैठकांवर बैठका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील बारामती मतदारसंगाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना शह देण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी त्यांच्याविरोधात निवडणुकीला उभ्या राहणार आहेत. मविआकडून आज भोरमधील हरिश्चंद्री येथे सभा घेण्यात झाली. या सभेमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा मुलगा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोणत्या नेत्याने केली टीका?

हातामध्ये बॅट न धरता जय शाह बीसीसीआयचा अध्यक्ष बनला. मला कुणीतरी विचारलं की, जय शाह आणि क्रिकेटचा संबंध काय? मी म्हटलं सुनील गावस्कर यांना जय शाह यांनी शिकवलं. कपिल देवला बॉलिंग, बॉल कसा घासायचं हे जय शाह यांनी शिकवलं. विरेंद्र सेहवागला सिक्स मारता येत नव्हता. ते जय शाहने शिकवलं. त्यामुळे जय शाह भारतीय क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष असल्याचा असा टोला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लगावला.

जलद गतीने फेकाफेक करणारी व्यक्ती म्हणून किंवा या फेकाफेकीचा खेळ म्हणून ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करावा, त्या खेळाचं कोच म्हणून नरेंद्र मोदी यांची नेमणूक करावी, असा प्रस्ताव आमचा शरद पवार यांच्याकडे आहे. कारण त्यांचा खेळाशी संबंध आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचाही खेळाशी संबंध आहे, असं म्हणत राऊत यांनी राऊतांवर निशाणा साधला.

दरम्यान,  भोरमध्ये झालेल्या सभेमध्ये शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. त्यासोबतच काँग्रेसटचे आमदार संग्राम थोपटे यांच्यामागे शरद पवार असल्याचं सांगितलं. याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा संघर्ष भोर तालुक्याने पाहिलाय. अनंतराव थोपटे यांना पराभूत करण्यासाठी शरद पवार यांनी भोरमध्ये सभा घेतली होती. आता राजकीय समीकरण बदलली असून त्यांचेच पुत्र संग्राम थोपटेंना पवार यांनी पाठिंबा दिला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल