मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता खालवल्याने श्वसनाच्या आजारात वाढ; HMVP ची स्थिती काय?

सध्या मुंबईत मोठी विकासकामे सुरु आहे. त्यासोबतच इमारतीच्या बांधकामांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मुंबईतील हवेत मोठ्या प्रमाणात धूलिकण मिसळले आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता ही ढासळल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता खालवल्याने श्वसनाच्या आजारात वाढ; HMVP ची स्थिती काय?
mumbai air pollution (1)
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 1:58 PM

Mumbai Air Pollution : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता 156 इतकी नोंदवण्यात आली आहे. तर हवेतील २.५ पीएमचं प्रमाणही कमी होताना दिसत नाही. तसेच पीएम 10 चे प्रमाणही जैसे थे स्थितीत आहे. यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) आज 156 इतका नोंदवण्यात आला आहे. हा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत येतो. सध्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील हवेची गुणवत्ता खालवली आहे. मुंबईची हवा अत्यंत चिंताजनक झाली आहे. त्यामुळे सध्या मुंबईत ठिकठिकाणी अंशत: ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने सध्या मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत. आज मुंबईत एक्युआय 156 इतका आहे. तर हवेतील पीएमचं प्रमाण 2.5 इतक्या पातळीवर घसरलं आहे. तर पीएम 10 चे प्रमाणही जैसे थे स्थितीत आहे. यामुळे मुंबईकरांना श्वसनाचे आजारांनी हैराण झाले आहेत. सध्या मुंबईत मोठी विकासकामे सुरु आहे. त्यासोबतच इमारतीच्या बांधकामांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मुंबईतील हवेत मोठ्या प्रमाणात धूलिकण मिसळले आहेत. त्यामुळे हवेची गुणवत्ता ही ढासळल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुंबईतील वायू प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे मुंबई महापालिका आणि राज्याच पर्यावरण विभाग अलर्ट मोडवर आहे. मुंबईच्या वायू प्रदूषणावर सरकारकडूनही कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेकडून वॉटर कॅनन फवारणी केली जात आहे. मुंबईतील विविध भागात वॉटर कॅनन फवारणी केली जात असली तरी याचा फारसा फरक जाणवत नाही.

एचएमपीव्ही व्हायरसचा धुमाकूळ

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जगभरात ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही (HMVP) हा व्हायरस धुमाकूळ घालत आहे. हा श्वसनाशी संबंधित व्हायरस आहे. ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही (HMVP) तीव्र श्वसन संसर्ग होते. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडसमध्ये २००१ मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो.

भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?.
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'.
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही.
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी.
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल...
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल....