AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आर्थिक मंदीचा बांधकाम परवाना शुल्काला फटका, मुंबई महापालिकेचं उत्पन्न घटणार!

मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक डोलारा संभाळणारा विभाग अशी ओळख असलेल्या बांधकाम विभागाला मार्च अखेर केवळ 561 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात यश आले (Mumbai construction license fee decrease) आहे.

आर्थिक मंदीचा बांधकाम परवाना शुल्काला फटका, मुंबई महापालिकेचं उत्पन्न घटणार!
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jan 10, 2020 | 7:35 AM
Share

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक डोलारा संभाळणारा विभाग अशी ओळख असलेल्या बांधकाम विभागाला मार्च अखेर केवळ 561 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात यश आले (Mumbai construction license fee decrease) आहे. 2017-18 या आर्थिक वर्षासाठी बांधकाम विभागाकडून 1 हजार 400 कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. मात्र बांधकाम क्षेत्रातील मंदीमुळे बांधकाम परवाना शुल्कात मोठा फटका बसला आहे.

महापालिकेचा कारभार राज्य सरकारकडून मिळणाऱ्या स्थानिक संस्थाच्या कराच्या (एलबीटी) बदल्यात मिळणारे वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) अनुदान, मिळकतकर आणि बांधकाम परवाना शुल्क या प्रमुख उत्पन्नांवर तग धरून असतो. 2017-18 या वर्षात जीएसटी अनुदान आणि मिळक़तकरात अपेक्षित उत्पन्न मिळविण्याची कामगिरी पालिकेने केली आहे.

मात्र, बांधकाम परवाना शुल्कातून अपेक्षित उत्पन्न मिळविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. महापालिका प्रशासनाने बांधकाम परवान्यातून 1 हजार 400 कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ 561 कोटी 46 लाख इतके उत्पन्न २८ मार्चपर्यंत जमा झाले आहे.

त्यामुळे जवळपास 838 कोटी 54 लाखांचा फटका पालिकेला बसला आहे. गेल्या दोन वर्षांत मिळालेल्या उत्पन्नाप्रमाणेच यंदाही उत्पन्नाचा चढता आलेख कायम राहिला आहे. 2016-18 या वर्षात 532 कोटी 97 लाख तर, 2015-16 या वर्षात 747 कोटी 30 लाखांचे उत्पन्न पालिकेला बांधकाम परवाना शुल्कातून मिळाले होते.

पालिकेच्या उत्पन्नाचा महत्वपूर्ण स्त्रोत म्हणून बांधकाम विभागाकडे पाहिले जाते. मात्र आता बांधकाम परवाना शुल्क घटल्याने पालिकेचे अंदाजपत्रक गडबडले आहे. त्याचा फटका थेट भांडवली विकासकामांना बसला आहे. त्यातच पालिकेने मेट्रो, नदी सुधारणा योजना, समान पाणी पुरवठा योजना, कात्रज-कोंढवा रोड असे मोठे प्रकल्प हाती घेतले आहेत. पालिकेचे ‌उत्पन्न घटल्याने या सर्व प्रकल्पांना आवश्यक निधी उपलब्ध करून देताना प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार (Mumbai construction license fee decrease) आहे.

Follow Us
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा