Corona | मुंबईत विनामास्क फिरल्यास 1 हजार रुपये दंड, पालिकेचा निर्णय

| Updated on: Jun 29, 2020 | 7:16 PM

मुंबईत विनामास्क फिरल्यास आढळल्यास संबंधित व्यक्तीकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार (Penalty Not Wearing Mask) आहे.

Corona | मुंबईत विनामास्क फिरल्यास 1 हजार रुपये दंड, पालिकेचा निर्णय
Follow us on

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईत मास्क लावणे बंधनकारक करण्यात (Mumbai Bmc 1000 Rs. fine For Penalty Not Wearing Mask) आले आहे. जर कोणी मुंबईत विनामास्क फिरल्यास आढळले तर त्याच्याकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबईत दरदिवशी जवळपास एक हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात येत आहे. मुंबईत दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर हळहळू स्थिती पूर्वपदावर येत आहे.

कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करताना देखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल.

तसेच जो कोणी मुंबईत विनामास्क फिरताना आढळल्यास त्याच्याकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल, असे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. जो कोणी या आदेशाचे उल्लघंन करेल त्याच्यावर कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात येईल. (Mumbai Bmc 1000 Rs. fine For Penalty Not Wearing Mask)

संबंधित बातम्या : 

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर सैफी रुग्णालयात, सकाळपासून ताप आल्याने तपासणी

Unlock 2 | ‘अनलॉक 2’मध्ये दोन किमीची ‘लक्ष्मणरेषा’, काय आहेत निर्बंध?