जिओ कंपनीमुळे आमचा धंदा धोक्यात; मुंबईतील केबलचालक गाऱ्हाणे मांडण्यासाठी ‘राज’दरबारी

| Updated on: Nov 09, 2020 | 10:39 AM

मनसेच्या या इशाऱ्यानंतर अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात आला होता. | Raj Thackeray

जिओ कंपनीमुळे आमचा धंदा धोक्यात; मुंबईतील केबलचालक गाऱ्हाणे मांडण्यासाठी राजदरबारी
Follow us on

मुंबई: जिओ कंपनीच्या आक्रमक धोरणामुळे आमचा धंदा धोक्यात आल्याचे गाऱ्हाणे घेऊन मुंबईतील केबलचालक राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. जिओ कंपनीकडून (Jio) विनापरवाना कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी झाडे, रस्ते आणि वीजेच्या खांबांवरुनही केबल टाकल्या जात आहेत. जिओ कंपनीमुळे बाजारपेठेत निर्माण झालेल्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी इन मुंबई, हॅथवे, डीजे आणि सिटी केबल या कंपन्या एकत्र आल्या आहेत. मात्र, जिओच्या प्रचंड रेट्यामुळे आमचा व्यवसाय धोक्यात आल्याचे केबल चालकांचे म्हणणे आहे. (Mumbai cable tv operators meet MNS chief Raj Thackeray)

त्यामुळे आता राज ठाकरे मुंबईतील केबलचालकांची कशाप्रकारे मदत करणार, हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वीच अ‍ॅमेझॉन अ‍ॅपममध्ये मराठी भाषेचा समावेश नसल्याविरोधात ‘मनसे’कडून आवाज उठवण्यात आला होता. मनसेने अ‍ॅमेझॉनला खळ्ळ खट्याकची धमकीही दिली होती. मनसेच्या या इशाऱ्यानंतर अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी बेस्टच्या हंगामी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यात आले होते. हे कर्मचारी सोमवारी राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर येणार आहेत.

नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा कृष्णकुंजवर पक्षप्रवेश

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) जोरदार इनकमिंग सुरु असल्याचे दिसत आहे. आज नवी मुंबईतील काहीजण मनसेत प्रवेश करण्यासाठी कृष्णकुंज येथे येणार आहेत. यामध्ये विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेत प्रवेश करणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील युवासेनेचे उपनेते संग्राम माळी यांनी मनसेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी शिवडी आणि वरळीतील शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनीही मनसेचा झेंडा हाती धरला होता. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बाब मनसेसाठी फायदेशीर मानली जात आहे.

संबंधित बातम्या:

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टच्या ऑफिसवर मनसेची कूच; ‘मराठी’साठी खळ्ळखट्याकचा दिला इशारा

मनसेत जोरदार इनकमिंग; नवी मुंबईतील कार्यकर्त्यांचा कृष्णकुंजवर होणार पक्षप्रवेश

अखेर मराठी भाषेचा अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये समावेश, मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल

(Mumbai cable tv operators meet MNS chief Raj Thackeray)