मुंबईत 8 वॉर्डमध्ये 200 हून अधिक रुग्ण, कोणत्या वॉर्डत किती?

मुंबईत 8 वॉर्डमध्ये 200 हून अधिक रुग्ण, कोणत्या वॉर्डत किती?

महाराष्ट्रात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक 4 हजार 205 जणांना कोरोनाची लागण झाली (Mumbai Corona Patients Update) आहे.

Namrata Patil

|

Apr 23, 2020 | 8:53 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला (Mumbai Corona Patients Update) आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक 4 हजार 205 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर राज्यात 6 हजार 427 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत आतापर्यंत 168 जणांना कोरोना बळी गेले आहेत. मुंबईतील 8 पेक्षा अधिक वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर 7 वॉर्डमध्ये 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा साडेतीन हजाराच्या उंबरठ्यावर असल्याने मुंबईकरांची धाकधूक वाढली आहे. ‘जी दक्षिण’ वॉर्डमध्ये ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 507 वर पोहोचली आहे. मुंबईतील आठ वॉर्डमध्ये आतापर्यंत प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त आढळले आहेत.

मुंबईत एकूण 13 वॉर्डमध्ये प्रत्येकी शंभरपेक्षा जास्त ‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण सापडलेल्या प्रभागाप्रमाणे 22 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेने नकाशा जारी केला आहे. यात ‘जी दक्षिण’मध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आकडेवारी सर्वाधिक पाहायला मिळत आहे. दिलासादायक बाब म्हणजे या वॉर्डमध्येच सर्वाधिक म्हणजे 72 रुग्ण उपचारानंतर बरेही झाले आहेत.

वॉर्डनिहाय कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या (कंसात बरे झालेले रुग्ण)

जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड – 507 (72) रुग्ण बरे

– भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडी बंदर – 368 (31)

जी उत्तर – माहिम, धारावी, शिवाजी पार्क257 (20)

एल – चुनाभट्टी, कुर्ला – 267 (9)

एफ उत्तर– सायन, माटुंगा, वडाळा – 260 (16)

के पश्चिम – अंधेरी, जोगेश्वरी, जुहू, वर्सोवा264 (32)

डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली – 234 (32)

के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व – 203 (43)

एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व – 165 (17)

एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर, शिवाजीनगर – 166 (14)

एफ दक्षिण – परळ, शिवडी – 138 (8)

ए – कुलाबा, कफ परेड , फोर्ट – 117 (8)

एम पश्चिम – चेंबुर – 115 (13)

एस – 103 (17)

पी उत्तर – 102 (17)

(Mumbai Corona Patients Update)

शंभरपेक्षा कमी रुग्ण असलेले प्रभाग

  • दक्षिण – 84 (10)
  • एच पश्चिम – 85 (14)
  • उत्तर – 84 (10)
  • आर मध्य – 74 (13)
  • पी दक्षिण – 71 (13)
  • बी – 62 (7)
  • आर मध्य – 36 (10)
  • टी – 26 (5)
  • मध्य – 28 (3)
  • आर उत्तर – 22 (6)

(Mumbai Corona Patients Update)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें