AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीची सूत्र नेमकी कुणाकडे; अजित पवार काय म्हणाले?

DCM Ajit Pawar on NCP Leadership : राष्ट्रवादीची सूत्र कुणाकडे? येत्या काळात राष्ट्रवादी पक्षाची सूत्रं कुणाकडे असतील? यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं. टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार काय म्हणाले? राजकीय समिकरणांवर अजित पवारांनी काय भाष्य केलं? वाचा...

राष्ट्रवादीची सूत्र नेमकी कुणाकडे; अजित पवार काय म्हणाले?
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 24, 2024 | 6:34 PM
Share

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची सूत्र नेमकी कुणाकडे असतील? याची राज्यासह देशाच्या राजकारणात चर्चा होते. यावर अजित पवार यांनी उत्तर दिलं. टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवार यांनी यावर स्पष्ट भाष्य केलं. येत्या चार-पाच वर्षात याचं उत्तर मिळेल, असं अजित पवार म्हणाले. चार पाच वर्ष महाराष्ट्रातील जनतेला कळेल. चार पाच वर्षात. कुणाकडे सुत्रे राहतील. त्यात विशेष काय. ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलं नाही. जनता ज्याच्या पाठी त्याला संधी मिळेल. ठरावीक काळ झाल्यावर थांबलं पाहिजे. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात तुम्ही कधी तरी थांबतना . वकील, खेळाडू, डॉक्टरही थांबतात. पण कुणी कुठे थांबावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही त्यावर बोलू शकत नाही,  असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार ट्रॅपमध्ये फसले का?

कुणाला काय बोलायचं ते बोलू द्या. आम्ही कुणाच्या ट्रॅपमध्ये फसलो नाही. अजित पवार कुणाच्या ट्रॅपमध्ये फसणारा माणूस नाही. माझं रोखठोक काम असतं. असलं लेचंपेचं काम माझ्याकडे नाही. राजकीय जीवनात वाटलं तेव्हा राजीनामा टाकला आणि निघून गेलो. जे काही चित्र रंगवलं जातं, सांगितलं जातं ते धांदात खोटं आहे. त्यात तसूभर, नखाच्या एवढंही सत्य नाही, असं अजित पवार म्हणाले.

बारामतीच्या लढतीवर अजित पवार म्हणाले…

बारामतीतील लढतीवर अजित पवार यांनी भाष्य केलं. दोघांची राजकीय कारकिर्द पणाला लागली का? यावर अजित पवार बोलले. निवडणूक म्हटल्यावर यश अपयश असतं. आमच्या घरात आजच झालेलं नाही. फार पूर्वी वसंतदादा पवार हे आमचे थोरले काका… आमचं अख्खं घराणं शेतकरी कामगार पक्षाचं होतं नवीन पिढीला माहीत नाही. नवीन बारामतीकरांना माहीत नाही. जुन्या बारामतीकरांना माहीत आहे. तेव्हा एकटे पवार साहेब काँग्रेससाठी काम करत होते. अख्खं घराणं आजी आजोबा, सर्व त्यांची मुली, मुलं सर्व मेंबर हे शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होते. ही इतिहासाची नोंद आहे. १९६२चा काळ होता, असं अजित पवार म्हणाले.

Follow Us
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...