Aryan Khan case : सुनील पाटील यांनी केपी गोसावीची ओळख गुप्तहेर म्हणून करून दिली; विजय पगारेंचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Nov 06, 2021 | 8:20 PM

पगारे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना अजून एक खळबळजनक दावा केलाय. सुनील पाटील यांनीच केपी गोसावीची ओळख गुप्तहेर म्हणून करुन दिल्याचं पगार यांनी सांगितलं. इतकंच नाही तर तर सुनील पाटील, मनिष भानुशाली आणि केपी गोसावी आदींचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावाही विजय पगारे यांनी केलाय.

Aryan Khan case : सुनील पाटील यांनी केपी गोसावीची ओळख गुप्तहेर म्हणून करून दिली; विजय पगारेंचा मोठा गौप्यस्फोट
तुझ्या सेल्फीच्या चरबीमुळे डील फसली, सुनील पाटील केपी गोसावीवर भडकला
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई ड्रग्स प्रकरणात 100 टक्के अडकवण्यात आल्याचा दावा विजय पगारे यांनी केलाय. त्यानंतर आता पगारे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना अजून एक खळबळजनक दावा केलाय. सुनील पाटील यांनीच केपी गोसावीची ओळख गुप्तहेर म्हणून करुन दिल्याचं पगार यांनी सांगितलं. इतकंच नाही तर तर सुनील पाटील, मनिष भानुशाली आणि केपी गोसावी आदींचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावाही विजय पगारे यांनी केलाय. (Aryan Khan Case Sunil Patil introduced KP Gosavi as a spy, Vijay Pagare’s sensational claim)

आर्यन खान प्रकरणात मोठं रॅकेट काम करत होतं. आर्यनवरील कारवाई ही ठरवून केली गेली आहे. या प्रकरणात पूजा ददलानी, सॅम डिसोझा, केपी गोसावी, मनिष भानुशाली आणि मास्टर माईंड सुनील पाटील यांच्यात 100 ठक्के डील झाली होती. सुनील पाटीलसोबत असल्यामुळे या डीलबाबत माहिती मिळाली होती. सुनील पाटील हा हॉटेल ललितमध्ये राहत होता. गोसावीच्या एका सेल्फीमुळे ही डील फिस्कटली, असा दावा विजय पगारे यांनी केलाय.

‘द ललितमध्ये पार्ट्या व्हायच्या’

सुनील पाटील यांच्यासोबत मी द ललित हॉटेलमध्ये राहायला होतो. तेव्हा तिथे सॅम डिसोझा, मनिष भानुशाली सातत्याने यायचे. त्यांच्यासह अजून काही लोकही यायचे. पण सुनील पाटील याने मला सांगितलं होतं की तुला तुझ्या पैशाशी देणंघेणं आहे. त्यामुळे तिथे लोक आल्यावर मी आतल्या खोलीत जाऊन बसायचो. हॉटेल ललितमध्ये त्यांच्या अनेक पार्ट्या, त्यात ड्रग्स पार्ट्याही चालायच्या, असा खळबळजनक दावा विजय पगारे यांनी केलाय. दरम्यान, द ललित हॉटेलमध्ये केपी गोसावी कधीच आला नाही. त्याला मी अहमदाबादला पाहिलं होतं. तिथेच त्याची ओळख करुन देण्यात आली होती, असंही पगारे यांनी सांगितलं.

विजय पगार नेमकं काय म्हणाले?

गेल्या पाच सहा महिन्यांपासून मी सुनील पाटील यांच्यासोबत आहे. ते माझं एक काम काढून देणार होते. त्यांना मी पैसे दिले होते. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्याकडे पैशाची मागणी करत होतो. त्यासाठी सतत त्यांच्यासोबत होतो. मी त्यांच्यासोबत ‘द ललित’ हॉटेललाही थांबलो आणि अनेक हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत राहिलो. पण फॉर्च्युन हॉटेलमध्ये 27 सप्टेंबर रोजी वाशीमध्ये फॉर्च्युनमध्ये दोन रुम बूक होते. साधारण साडे सातच्या सुमारास भानुशाली आणि एक जाडी मुलगी त्या ठिकाणी आली होती. दुसऱ्या रुममध्ये मी, किरण गोसावी आणि सुनील पाटील असे तिघे जण होतो. भानुशाली त्याच्या रुममध्ये दोन तास थांबला. नंतर निघताना भानुशाली आमच्या रुममध्ये आला. यावेळी त्याने सुनील भाऊंची पप्पी घेतली. भाऊ बडा गेम हो गया. आपने को अभी के अभी अहमदाबाद निकलना है. नाना को नही लेना है. (मला नाना म्हणतात) मी म्हणालो, तुमचं काय असेल ते असेल. पण माझे पूर्ण पैसे मिळाले पाहिजे. त्यावर तुम्ही चिंता करू नका तुम्हाला तुमचे पैसे मिळेल, असं भाऊ म्हणाले. आम्ही येईपर्यंत रुम सोडू नको म्हणून त्यांनी मला बजावलं होतं, असं पगारे म्हणाले.

‘तुझे पैसै मिळतील एवढंच ते सांगायचे’

त्यानंतर ते रात्री साडे अकरा बारा वाजता अहमदाबादला जायला निघाले. 28 तारखेला मी संध्याकाळी सुनील भाऊंना फोन केला तर ते म्हणाले अहमदाबादला पोहोचलो नाही. गाडीचं काम निघालं. त्यामुळे पोहोचलो नाही. त्यानंतर मी 29 तारखेला फोन लावला. सुनील भाऊ म्हणाले, तू आराम कर तुझे पैसे मिळतील. त्यानंतर त्यांचे स्वत:हून फोन आले. तुझे पैसे मिळतील, एवढंच ते सांगत होते, असं त्यांनी सांगितलं.

‘एनसीबी कार्यालयात आल्यावर ट्यूब पेटली’

एकदा सकाळी सात सव्वासातला मनिष भानुशाली माझ्या रुममध्ये आला, अपना काम हो गया. तेरा पैसा मिल जायेगा. सुनील भाऊ अहमदाबाद गया है. आम्ही गाडीतून निघालो. त्यावेळी तो बडबड करत होता. इतने में डील हुआ था. इतनाही क्यों मिला? 50 लाख रुपये लेकर केपी गोसावी गायब तो नही हो गया? असं तो बडबडत होता. मला त्याचं काही समजत नव्हतं. तासभर आम्ही प्रवास करत होतो. त्यावेळी तो अनेकदा फोनवर बोलला. कधी सुनील भाऊशी तर कधी इतरांशी. मी हे सर्व ऐकत होतो. त्यावेळी नेमकं काय चाललं हे मला कळलं नाही. पण एनसीबीच्या कार्यालयात पोहोचल्यावर तिथे मीडिया होता. पोलीस होते. मी एकाला विचारलं तर शाहरुखच्या मुलाला अटक झाल्याचं मला कळलं. त्यावेळी माझी ट्यूब पेटली. भानुशाली याच प्रकरणाबाबत बोलत असल्याचं क्लिक झालं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

इतर बातम्या :

VIDEO: सुनील पाटील प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी

आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप असणारे सुनील पाटील कोण?; वाचा सविस्तर

Aryan Khan Case Sunil Patil introduced KP Gosavi as a spy, Vijay Pagare’s sensational claim