AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Fire : मुंबईतील भायखळा येथील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग, फायर ब्रिगेड घटनास्थळी

मुंबई: मुंबईतील भायखळा परिसरातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग लागलीय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबईतील भायखळा भागात ही घटना घडलीय.

Mumbai Fire : मुंबईतील भायखळा येथील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग, फायर ब्रिगेड घटनास्थळी
मुंबईतील भायखळा परिसरात आगImage Credit source: Tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 2:48 PM
Share

मुंबई: मुंबईतील (Mumbai Fire) भायखळा (Bhayculla)परिसरातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग लागलीय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबईतील भायखळा भागात ही घटना घडलीय. ही आग मोठी असल्याचं येत असलेल्या दृश्यांमधून दिसून येत आहे. गेल्या एक तासांपासून ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) आठ गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत. हा रहिवाशी परिसर असल्यानं नेमकं किती नुकसान झालंय यासंबंधी माहिती मिळालेली नाही. आगीचं कारण देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आगीत जीवितहानी झालीय की नाही याबाबत आतापर्यंतची माहिती समोर आलेली नाही, असं कळतंय.

मुंबईत आग सत्र सुरुच

मुंबईतील आग लागण्याच्या घटना सुरुच आहेत. आज दुपारी 1  वाजताच्या दरम्यान भायखळा परिसरातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेट या परिसरात ही आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहे आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं कळतंय.

आगीचं कारण अस्पष्ट

भायखळा परिसरातील झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आग लागल्यानं धुरांचे लोट परिसरात दिसून येत होते. झकेरिया इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

आगीत नुकसान किती?

मुंबईतील भायखळा परिसरात आज दुपारी लागलेल्या आगीमुळं नेमकं किती नुकसान झालं. हे अद्याप समोर आलं नाही. आगीच्या घटनेत जीवितहानी झाली आहे की नाही हे देखील अद्याप समोर आलेलं नाही.

मुंबईत आगीच्या वाढत्या घटना

मुंबईत काही दिवसांपूर्वी अविघ्न या इमारतीमध्ये आग लागली होती.  त्यानंतर देखील मुंबईत आगीच्या घटना घडल्या होत्या. मुंबई महापालिका प्रशासन आगीच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी काय प्रयत्न करते हे पाहावं लागणार आहे.

भायखळा परिसरात जानेवारी महिन्यात देखील आग

मुंबईतील भायखळा परिसरात जानेवारी महिन्यात आग लागली होती. भायखळा येथील मुस्तफा बझार येथे लाकडाच्या गोडाऊनला आग लागली होती. आज देखील भायखळा परिसरातील इकेरिया इंडस्ट्रिलय इस्टेटला आग लागली आहे. येथील आगीत नेमकं किती नुकसान झालं हे पाहावं लागेल. या संदर्भातील अधिक माहिती समोर आलेली नाही.

इतर बातम्या: 

निवडणूक आयोगाने राजकीय आरक्षणाची माहिती दिली नाही; छगन भुजबळांचा आरोप

IND vs SL 1st Test: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग XI बद्दल रोहितच मौन, विराटच्या 100 व्या कसोटीवर म्हणाला….

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.