AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील जुने जैन मंदिर पाडल्यानंतर समाज संतप्त, कारवाईविरोधात आज अहिंसक रॅली

मंदिर पाडण्याबाबत बीएमसीने जैन समाजाला नोटीस दिली होती. त्याविरोधात जैन समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच बुधवारी बीएमसीच्या पथकाने मंदिर तोडले.

मुंबईतील जुने जैन मंदिर पाडल्यानंतर समाज संतप्त, कारवाईविरोधात आज अहिंसक रॅली
मंदिर पाडल्यानंतर जैन समाज संतप्त. मुंबईत आज आंदोलन.Image Credit source: TV 9 Marathi
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Apr 19, 2025 | 9:54 AM
Share

मुंबईतील विलेपार्लेतील कांबळीवाडी येथील ९० वर्षे जुने पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई मनपाने दोन दिवसांपूर्वी पाडले होते. त्यानंतर देशभरातील जैन समुदाय संतप्त झाला आहे. मंदिर पाडण्याच्या कारवाईविरोधात शनिवारी सकाळी ९:३० वाजता अहिंसक रॅली काढण्यात येईल. त्या रॅलीत मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग अलवाणी यांच्यासह जैन समाजाचे संत सहभागी होणार आहेत.

दरम्यान, मंदिर तोडलेल्या ठिकाणी जैन बांधवांकडून आरती करण्यात येत आहे. या मंदिरावर पालिकेकडून कारवाई करण्यात आल्यानंतर आज सर्वपक्षीय नेत्यांकडून कारवाईच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच या पुढे काय भूमिका घ्यावी, त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.

बीएमसीच्या कारवाईनंतर जैन समाजात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. बीएमसीचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासनाची जबाबदारी आता सरकारकडे आहे.

मंदिर पाडण्याबाबत बीएमसीने जैन समाजाला नोटीस दिली होती. त्याविरोधात जैन समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी होणार होती. त्यापूर्वीच बुधवारी बीएमसीच्या पथकाने मंदिर तोडले. न्यायालयाच्या निर्णयानंतर बीएमसी प्रशासनाने कारवाई करायला हवी होती, असे जैन समाजाने म्हटले आहे.

विले पार्लेमधील नेमिनाथ कोऑपरेटीव्ह हाउसिंग सोसायटी परिसरात 90 वर्ष जुने जैन मंदिर होते. मंदिराचे विश्वस्त अनिल शाह यांनी सांगितले की, बीएमसीने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. आम्ही उच्च न्यायालयात अपील दाखल केल्याचे बीएमसीला माहीत होते. परंतु बीएमसी प्रशासनाने घाई गर्दीत मंदिर पाडले. आम्ही अधिकाऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयापर्यंत वाट पाहण्याची विनंती केली होती. परंतु त्यांनी आमचे काही ऐकले नाही अन् मंदिर तोडून टाकले.

या मंदिराच्या समर्थनार्थ आज जैन बांधवांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पूर्वी या कारवाई केलेल्या मंदिरात जैन बांधवांकडून आरती करण्यात आली. तसेच हे मंदिर कोणाच्या आदेशावरुन तोडण्यात आले? याबाबत प्रश्न जैन बांधवांनी विचारला आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा