AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…यामुळे वाघ्या कुत्र्याचा विषय थांबवला होता, संभाजीराजे भोसले यांची माहिती

Raigad waghya dog statue Controversy : शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी देणगी देणारे तुकोजीराव होळकर यांचे नाव सुवर्ण अक्षरात त्या ठिकाणी लिहिले जावे, ही जबाबदारी मी घेतली आहे. मी या सर्व विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहे.

...यामुळे वाघ्या कुत्र्याचा विषय थांबवला होता, संभाजीराजे भोसले यांची माहिती
Sambhajiraje
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 17, 2025 | 12:02 PM
Share

Raigad waghya dog statue Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा विषय थांबवला नाही. तो काही काळ स्थगित केला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रायगड दौऱ्यावर होते. त्यामुळे हा विषय काही काळ थांबवला होता. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहोत. मुळात वाघा कुत्र्याचा विषय एक दंतकथा आहे. या दंतकथेतून निर्माण झालेले पात्र शिवाजी महाराज यांच्या समाधीशेजारी नको, असे संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर ते गुरुवारी माध्यमांशी बोलत होते.

संभाजीराजे काय म्हणाले…

संभाजीराजे भोसले यांनी वाघ्या कुत्र्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर हा विषय चर्चेला आला. वाघ्या कुत्र्याची रायगडावरील प्रतिमा हटवण्यास संभाजी भिडे, लक्ष्मण हाके यांनी विरोध केला. परंतु संभाजीराजे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. गुरुवारी ते मुंबईत आले. त्यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, वाघ्या कुत्र्याचा विषय एक दंतकथा आहे. दंतकथेतून निर्माण झालेले चित्र शिवाजी महाराज यांच्या समाधीशेजारी उभे राहणे चुकीचे आहे. वाघ्या कुत्र्याबाबत मी सविस्तर सांगितले आहे. त्या कुत्र्याची प्रतिमा त्या ठिकाणावरुन काढायला हवी.

संभाजीराजे पुढे म्हणाले, शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी देणगी देणारे तुकोजीराव होळकर यांचे नाव सुवर्ण अक्षरात त्या ठिकाणी लिहिले जावे, ही जबाबदारी मी रायगड प्राधिकरणाचा अध्यक्ष या नात्याने घेतली आहे. मी या सर्व विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करणार आहे. आज किंवा उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत माझी चर्चा होईल. त्यावेळी या प्रकरणात समिती स्थापन करण्यासंदर्भात चर्चा होईल. अमित शाह रायगडला येणार होते, त्यामुळे काही काळासाठी मी विषय थांबवला होता. वाघ्या कुत्र्याची प्रतिमा काढण्याबाबत आमची कोणतीही डेडलाईन नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीबाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळेसोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. ते राज्याचे महसूल मंत्री आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील स्टेडियमची फाईल त्यांच्याकडे आली आहे. त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण आलो होतो.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान